गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर; बायकोच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला अभिनेता, म्हणाला- "मी कधीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:23 IST2026-01-19T11:21:10+5:302026-01-19T11:23:52+5:30

गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा हिनेच अनेकदा त्याचं अफेअर असल्याचं सांगितलं आहे. आता पुन्हा सुनिताने नवऱ्याच्या अफेअरबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर गोविंदाने या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. 

govinda talk about wife sunita ahuja allegations of extra marital affair | गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर; बायकोच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला अभिनेता, म्हणाला- "मी कधीही..."

गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर; बायकोच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला अभिनेता, म्हणाला- "मी कधीही..."

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यात बिनसल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. गोविंदा आणि सुनिता गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहतही नाहीत. गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा हिनेच अनेकदा त्याचं अफेअर असल्याचं सांगितलं आहे. आता पुन्हा सुनिताने नवऱ्याच्या अफेअरबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर गोविंदाने या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. 

एएनआयशी बोलताना गोविंदा म्हणाला की, "मला वाटतं की बहुतांश वेळा महिला चुकिच्या नसतात. माझी आई असो, माझी सासू असो किंवा माझ्या कुटुंबातील इतर कोणतीही महिला असो. मी कधीही माझ्या कुटुंबातील महिलांच्या विरोधात जात नाही. काही लोक वेगळ्या विचारसरणीचे असतात. सुनिताने एक चॅनेल सुरू केलं आहे. त्यावर ती सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करते. ती चॅनेलवर व्यावहारिक आणि वैचारिकदृष्ट्या प्रेरित असलेल्या चर्चा करते". 

पुढे गोविंदा म्हणाला, "मला माझ्या मित्राने एकदा विचारलं होतं की तुझ्याविरुद्ध कट रचला जातोय? तर त्यातून तू कसा बाहेर पडशील? मी त्याला म्हणालो की हे बघ ते १-२ वर्ष, ९-१० वर्ष किंवा अगदी १४-१५ वर्षही घडू शकतं. पण आपण प्रार्थना करतो. त्यानंतर सगळं निघून गेलेलं असतं तेव्हा आपण त्याकडे एक एक्सपरिमेंट म्हणून पाहतो". 

"कुटुंब एखाद्याच्या जाणूनबुजून रचलेल्या कटात अडकतं आणि लोक घाबरतात. ते सर्व गोविंदा नसतात. पण मला वाटतं की, ती खूप बुद्धिमान, सुशिक्षित आहे. पण मी अलिकडे जे पाहतोय, ते म्हणजे कधीकधी जर आपण बोललो नाही तर आपण कमकुवत दिसतो", असंही तो पुढे म्हणाला. 

Web Title : गोविंदा ने अफेयर के आरोपों पर दी प्रतिक्रिया: 'मैं कभी पारिवारिक महिलाओं के खिलाफ नहीं जाता'

Web Summary : गोविंदा ने पत्नी सुनीता के अफेयर के आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि वह अपने परिवार की महिलाओं का सम्मान करते हैं। उन्होंने वैवाहिक मुद्दों और बाहरी साजिशों को स्वीकार किया, प्रार्थना के माध्यम से लचीलापन पर जोर दिया। वह अपनी पत्नी को बुद्धिमान मानते हैं लेकिन महसूस करते हैं कि चुप्पी को कमजोरी के रूप में देखा जा सकता है।

Web Title : Govinda Addresses Affair Allegations: 'I Never Go Against Family Women'

Web Summary : Govinda responds to his wife Sunita's claims of an affair, stating he respects women in his family. He acknowledged marital issues and external plots, emphasizing resilience through prayer. He perceives his wife as intelligent but feels silence can be perceived as weakness.