"गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर सुनिताने एकदाही...", अभिनेत्याच्या डॉक्टरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:14 IST2026-03-11T14:13:53+5:302026-03-11T14:14:13+5:30
बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. गोविंदाचं वैवाहिक जीवन हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आता त्यानंतर गोविंदाच्या डॉक्टरने त्याच्या पत्नीबाबत मोठा खुलासा केला आहे.

"गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर सुनिताने एकदाही...", अभिनेत्याच्या डॉक्टरचा मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. गोविंदाचं वैवाहिक जीवन हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा त्याच्यापासून गेल्या काही वर्षांपासून वेगळं राहत असल्याचं समोर आलं होतं. सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती. गोविंदा आणि सुनिताची लेक टीना हिनेदेखील गेली दोन वर्ष कठीण होती असं म्हटलं आहे. आता त्यानंतर गोविंदाच्या डॉक्टरने त्याच्या पत्नीबाबत मोठा खुलासा केला आहे.
गोविंदाने २०२४ मध्ये चुकून स्वत:च्याच हाताने त्याच्या बंदुकीने गोळी मारली होती. जी त्याच्या पायाला लागली होती. त्यानंतर लगेचच गोविंदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर गोविंदाने फिजिओथेरेपी केली होती. पण, या फिजिओ थेरेपीच्या एकाही सेशनला सुनिता आली नव्हती, असा खुलासा डॉक्टरने केला आहे. गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची फिजिओथेरेपिस्ट डॉ. सुरभि धनवाला यांनी याबाबत सांगितलं आहे.
"गोविंदाने स्वत:च्याच पायाला गोळी मारुन घेतली होती. तेव्हाच त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केली होती. ते खूपच स्ट्राँग आहेत. ते रोज सकाळी लवकर उठतात, योगा करतात एक चांगलं लाइफस्टाइल ते फॉलो करतात. मी कधीच त्यांची पत्नी सुनिता यांना पर्सनली भेटलेले नाही. मात्र गोविंदा यांचे जेवढे पण फिजिओ थेरेपीचे सेशन्स झाले. त्यातल्या एकालाही त्या आल्या नव्हत्या", असं सुरभि धनवाला यांनी सांगितलं.
गोविंदा आणि सुनीताने १९८७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. आता लग्नाच्या ३८ वर्षांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, मागील काही काळापासून गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला होता. सुनिताने तर गोविंदावर अनेक आरोप लावले. त्याचं एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याचाही आरोप केला. तसंच लेकाच्या करिअरसाठी गोविंदाने काहीच योगदान दिलं नाही असं ती काही दिवसांपूर्वी म्हणाली होती.