"तिने खूप चुका केल्या आहेत, पण...", अखेर सुनितासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:12 IST2025-10-16T15:12:14+5:302025-10-16T15:12:34+5:30
गोविंदाची पत्नी सुनिताने त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचा खुलासाही सुनिताने केला होता. आता घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडलं आहे.

"तिने खूप चुका केल्या आहेत, पण...", अखेर सुनितासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. गोविंदाला त्याची पत्नी सुनिता अहुजाने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गोविंदाची पत्नी सुनिताने त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचा खुलासाही सुनिताने केला होता. आता घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडलं आहे.
गोविंदाने काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने पत्नीबद्दल भाष्य केलं. गोविंदा म्हणाली, "तिच्या स्वत:मध्येच एक लहान मूल आहे. माझी मुलंही सुनिताला एका लहान मुलाप्रमाणेच सांभाळतात. पण, तरीही तिने तिच्यावर दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तिने घरही सांभाळलं. ती खूप इमानदान आहे. ती जे बोलते ते चुकीचं नसतं. पण, कधी कधी ती अशा गोष्टी बोलते ज्या नाही बोलल्या पाहिजेत".
"पुरुष अशा पद्धतीने विचार करत नाहीत. मी नेहमी हेच म्हणतो की पुरुष जर घर चालवत असतील तर महिला अख्खं जग चालवतात. सुनिताने खूप साऱ्या चुका केल्या आहेत. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मी अनेकदा माफही केलं आहे. तुमची आई नसते तेव्हा तुम्ही बायकोवर जास्त अवलंबून असता. आणि तुमची पत्नीदेखील काही वेळाने आईसारखंच तुम्हाला समजावते आणि तुम्हाला ओरडतेही", असंही गोविंदा म्हणाला.
गोविंदा आणि सुनीताने १९८७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. आता लग्नाच्या ३८ वर्षांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. पण, गणपती आणि करवाचौथला एकत्र येत गोविंदा आणि सुनिताने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.