४० वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्यावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले- "तो पब्लिसिटी स्टंट पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:20 IST2025-06-11T18:19:01+5:302025-06-11T18:20:46+5:30

वयाने ४० वर्ष लहान असलेल्या शिवांगीला डेट करत असल्याने गोविंद नामदेव यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. शिवांगीने केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर याबाबत मौन सोडत गोविंद नामदेव यांनी खरं काय ते सांगितलं आहे.

govind namdev break silence on dating rumours with 40 years younger actress shivangi verma | ४० वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्यावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले- "तो पब्लिसिटी स्टंट पण..."

४० वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करण्यावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाले- "तो पब्लिसिटी स्टंट पण..."

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंद नामदेव आणि अभिनेत्री शिवांगी वर्माच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. वयाने ४० वर्ष लहान असलेल्या शिवांगीला डेट करत असल्याने गोविंद नामदेव यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. शिवांगीने केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर याबाबत मौन सोडत गोविंद नामदेव यांनी खरं काय ते सांगितलं आहे. तो पब्लिसिटी स्टंटचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'गौरीशंकर गोहरगंज वाले' सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे केल्याचं त्यांनी सांगितलं. 

गोविंद नामदेव यांनी ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ३१ वर्षीय शिवांगीला डेट करत असल्याच्या अफवांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "जेव्हा सिनेमा शूट होत होता तेव्हा दिग्दर्शक, निर्माता आणि शिवांगीसोबत सिनेमाच्या प्रमोशन स्ट्रॅटेजीबाबत चर्चा झाली होती. असा पब्लिसिटी स्टंट करणं गरजेचं होतं, या गोष्टीशी मी सहमत होतो. आम्ही याआधीच सिनेमाचा काही भाग शूट केला होता. त्यामुळे काही चांगले फोटो आमच्याकडे होते. शिवांगीचं असं म्हणणं होतं की आपल्यात चांगली केमिस्ट्री असली पाहिजे. आणि रोमँटिक जोडी दिसली पाहिजे. मी या सगळ्यासाठी तयार होतो. पण, मी तिला नक्की काय कंटेट करायचा आहे, हेदेखील विचारलं होतं". 

"मी तेव्हा तयार झालो. मात्र नंतर मला काहीही न विचारता तिने वेगळ्या पद्धतीने हे सर्व केलं. त्यामुळे गैरसमज निर्माण झाला. लोकांनी आमच्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर मला हे आवडलं नव्हतं. म्हणून मी तिच्याशी बोलतही नव्हतो. मला अशा गोष्टींमध्ये पडायचंही नव्हतं. या सगळ्यामुळे माझ्या घरीही तणावपूर्व वातावरण होतं. मी आणि माझी पत्नी वेगळं राहायचा विचार करत होतो. मी तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नव्हती. मी आताही दिली नसती. कारण, मी इथे कोणालाही काही सिद्ध करून दाखवायला आलेलो नाही", असंही ते पुढे म्हणाले. 


नेमकं काय झालं होतं?

'गौरीशंकर गोहरगंज वाले' नावाच्या सिनेमात शिवांगी आणि गोविंद एकत्र काम करत होते. या सिनेमात एक वृद्ध व्यक्ती तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. अशी सिनेमाची कथा होती. शिवांगीने या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो पोस्ट करत "प्रेमाला वय कळत नाही अन् नाही मर्यादा" असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, हा एक पब्लिसिटी स्टंट होता. 

Web Title: govind namdev break silence on dating rumours with 40 years younger actress shivangi verma