'गोलमाल' फेम मुरली शर्माची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, आहे खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 07:00 IST2021-08-06T07:00:00+5:302021-08-06T07:00:00+5:30

फार कमी जणांना माहित आहे की अभिनेता मुरली शर्माची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'Golmaal' is the wife of fame Murli Sharma. She is a famous Marathi actress | 'गोलमाल' फेम मुरली शर्माची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, आहे खूपच सुंदर

'गोलमाल' फेम मुरली शर्माची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, आहे खूपच सुंदर

बॉलिवूड अभिनेता मुरली शर्माने अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. गोलमाल चित्रपटाच्या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. प्रभासच्या साहो या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहणेच पसंत करतो. फार कमी जणांना माहित आहे की त्याची पत्नीदेखील मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मुरली शर्माच्या पत्नीचे नाव अश्विनी कळसेकर असून तिने मराठी चित्रपटांद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. त्यानंतर तिला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेमुळे मिळाली.

या मालिकेनंतर तिने कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिने मुसाफिर, अपहरण, फूंक, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.


अश्विनी कळसेकर आणि मुरली शर्मा यांनी २००९ मध्ये लग्न केले. हे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. पण अश्विनीचे पहिले लग्न नितेश पांडे या अभिनेत्यासोबत झाले होते. त्याने साया, एक रिश्ता साझेदारी का या मालिकांमध्ये तर ओम शांती ओम या चित्रपटात काम केले आहे.

त्या दोघांचे १९९८ मध्ये लग्न झाले होते. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि नितेशने अभिनेत्री अर्पिता पांडेसोबत लग्न केले.

घटस्फोटानंतर काही वर्षांनी मुरली तिच्या आयुष्यात आला. त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले.

Web Title: 'Golmaal' is the wife of fame Murli Sharma. She is a famous Marathi actress