​‘गो गोआ गॉन’ झाला होता फ्लॉप पण तरिही सीक्वल येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 15:59 IST2017-05-24T10:29:33+5:302017-05-24T15:59:33+5:30

तीन वर्षांपूर्वी आलेला ‘गो गोआ गॉन’ हा चित्रपट आठवतो. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट दणकून आपटला होता. पण प्रेक्षकांच्या एका खास ...

'Go Goa Gone' was a flop but it would be a sequel! | ​‘गो गोआ गॉन’ झाला होता फ्लॉप पण तरिही सीक्वल येणार!

​‘गो गोआ गॉन’ झाला होता फ्लॉप पण तरिही सीक्वल येणार!

न वर्षांपूर्वी आलेला ‘गो गोआ गॉन’ हा चित्रपट आठवतो. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट दणकून आपटला होता. पण प्रेक्षकांच्या एका खास वर्गाला हा चित्रपट खूप आवडला होता. कदाचित म्हणूनच दिग्दर्शक दिनेश विजन या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येत आहेत. होय, म्हणजेच सैफच्या या चित्रपटाचा दुसरा पार्ट येणार हे कन्फर्म आहे.
अलीकडे एका मुलाखतीत दिनेश यांनी ‘गो गोआ गॉन’चा पार्ट2 येणार असल्याचे सांगितले.  ओरिजनल कास्ट या सीक्वलमध्ये असावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सैफ अली खान तर जवळजवळ फायनल आहे. मी याबद्दल सैफशी बोललो आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. पहिल्या चित्रपटातील संवाद लोकांना खूप आवडले होते. त्यामुळे सीक्वलमध्येही आमचा संवादावरच भर असणार आहे, असे दिनेश म्हणाले.

‘गो गोआ गॉन’मध्ये सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत होते. तीन मित्र रेव्ह पार्टीसाठी एक बेटावर जातात. येथे त्यांची भेट लूना अर्थात पूजा गुप्ताशी होते. ती सुद्धा आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला आलेली असते. पण येथे एक विशिष्ट प्रकारची ड्रग्स खाल्यानंतर लोक जॉम्बी बनतात. तिन्ही मित्र हे ड्रग्ज घेत नसल्याने जॉम्बी बनण्यापासून वाचतात. पण जॉम्बी त्यांच्या मागे लागतात. यानंतर बोरीस अर्थात सैफ अली खान त्यांच्या मदतीला येतो, अशी या चित्रपटाची कथा होती. आता या चित्रपटाचा सीक्वल म्हटल्यावर इंटरेस्टिंग असणारच. तेव्हा सीक्वलमध्ये यापेक्षा वेगळे काय दिसते, ते आपण बघूच.

Web Title: 'Go Goa Gone' was a flop but it would be a sequel!