करिना कपूरच्या प्रसूतीआधीच घरी पोहोचल्या भेटवस्तू, बेबोने इन्स्टावर शेअर केली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 11:03 IST2021-02-19T10:53:10+5:302021-02-19T11:03:27+5:30

बेबोच्या बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी...

Gifts Arrive at Kareena Kapoor Khan's Residence Ahead of Her Baby's Arrival | करिना कपूरच्या प्रसूतीआधीच घरी पोहोचल्या भेटवस्तू, बेबोने इन्स्टावर शेअर केली झलक

करिना कपूरच्या प्रसूतीआधीच घरी पोहोचल्या भेटवस्तू, बेबोने इन्स्टावर शेअर केली झलक

ठळक मुद्देहे करिना आणि सैफचे दुसरे अपत्य असेल. दोघांना पहिला मुलगा आहे.  तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता.

कुठल्याही क्षणी करिना कपूर बाळाच्या जन्माची बातमी देऊ शकते. साहजिकच करिनाच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तूर्तास काय तर बेबोच्या बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. अगदी गिफ्टसची बरसात सुरु आहे.
दुस-यांदा आई होणार असलेल्या करिना व तिच्या येणा-या बाळासाठी जवळचे लोक भेटवस्तू पाठवत आहेत. करिनाने स्वत: इन्स्टाग्रामवर या गिफ्टसची एक छोटीशी झलकही दाखवली. 

फोटोग्राफर विरल भयानी यानेही हे गिफ्ट घेऊन जाणा-या व्यक्तिची व्हिडीओ शेअर केला आहे. यात पिंक आणि ब्ल्यू पॅकिंगमध्ये एक मोठे गिफ्ट करिनाच्या घरी पोहोचवले जात असल्याचे दिसतेय. घराबाहेर फोटोग्राफर्सची गर्दी दिसून येतेय. रिपोर्टनुसार, करिनाची प्रसूती 15 फेबु्रवारीच्या जवळपास होणार होती. मात्र कालपरवा करिनाचे पापा रणधीर कपूर यांनी बेबोची ड्यू डेट 20 फेबु्रवारी असल्याचे सांगितले होते.   तत्पूर्वी सैफ अली खाननेही करिनाची प्रसूती  फेब्रुवारीमध्ये होईल, असे म्हटले होते.

हे करिना आणि सैफचे दुसरे अपत्य असेल. दोघांना पहिला मुलगा आहे.  तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता.   गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करिनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. करिनाच्या डिलिव्हरी अगोदर सैफ अली खान आपले काम पूर्ण करून घेत आहे. 2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. दुस-या प्रेग्नंसीदरम्यानही करिना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत काम करत होती. 

 

Web Title: Gifts Arrive at Kareena Kapoor Khan's Residence Ahead of Her Baby's Arrival