/>तुषार कपूर हा लग्न न करता सेरोगेसीच्या माध्यमातून वडिल झाला आहे. यामुळे ही गोष्ट सर्वत्रच चर्चिली जात आहे. तुषारने आपल्या बाळाचे नाव ‘लक्ष्य’ ठेवले आहे. मोठ्या कालवधीनंतर त्यांच्या घरात छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. लक्ष्य हा आपले आजोबा जितेंद्र सोबत फोटोमध्ये संदुर दिसत आहे. एकता कपूरनेही आपल्या भाचासाठी मोठी शॉपिंग केली आहे. यामध्ये तिने लक्ष्यासाठी एक छानसा टी शर्ट खरेदी केला आहे. तो शर्ट परिधान केलेला एक फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, त्यावर वाइल्ड चाइल्ड असे लिहीलेले आहे. हा फोटो शेअर करताना तिने त्याखाली ,‘पहिल्यांदाचा मुलांच्या खरेदीसाठी शॉपींगमध्ये, माझ्या गोडस भाच्यासाठी ’ असे लिहिले आहे. या फोटोवरुन एकताला भाच्याच्या शॉपींगवरुन खूप आनंद वाटत असल्याचे दिसत आहे.
![]()
तुषार हा सिंगल फादर आहे. परंतु, आई व वडिल असे दोघांचेही प्रेम तो मुलाला देत आहे. तुषारचे सर्वच कु टुंब लक्ष्य याची संपूर्ण काळजी घेत आहे.
Web Title: Gift for Ekta Kapoor's Bhachi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.