Ghoul trailer: या हॉरर वेबसीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर उडेल रात्रीची झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 20:38 IST2018-07-10T20:35:54+5:302018-07-10T20:38:36+5:30
नेटफ्लिक्सने भारतात फार कमी वेळात पाय पसरले. तितक्याच कमी वेळात भारतीय प्रेक्षकांना ओरिजनल कॉन्टेंट उपलब्ध करून दिला. एक प्रोजेक्ट संपत नाही ...

Ghoul trailer: या हॉरर वेबसीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर उडेल रात्रीची झोप!
नेटफ्लिक्सने भारतात फार कमी वेळात पाय पसरले. तितक्याच कमी वेळात भारतीय प्रेक्षकांना ओरिजनल कॉन्टेंट उपलब्ध करून दिला. एक प्रोजेक्ट संपत नाही तोच याच्या दुसऱ्या प्रोजेक्टची चर्चा व्हायला लागते. काही दिवसांपूर्वी आलेली नेटफ्लिक्सची ‘लस्ट स्टोरिज’ ही सीरिज प्रचंड गाजली. सध्या ‘सेक्रेड गेम्स’ ही यावरची सीरिज प्रचंड गाजतेय. सैफ अली खान व नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेल्या या सीरिजने भारतीय प्रेक्षकांना जणू वेड लावले आहे. या सीरिजची चर्चा थांबत नाही तोच नेटफ्लिक्सने आणखी एका सीरिजची घोषणा केली आहे. होय, या सीरिजचे नाव आहे, ‘घोल’. राधिका आपटे आणि मानव कौल यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज नेटफ्लिक्सची नवी हॉरर वेब सीरिज आहे.
तीन भागांत रिलीज होणा-या या वेबसीरिजचा ट्रेलर आज रिलीज झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही रात्री झोपू शकणार नाही, इतके मात्र नक्की. आपल्या यापूर्वीच्या वेबसीरिजप्रमाणे नेटफ्लिक्सची ही वेबसीरिजही दमदार दिसतेय. राधिका आणि मानवचा अभिनयही तितकाच दमदार भासतोय. ट्रेलरमध्ये राधिका व मानव एका केसच्या चौकशीदरम्यान एका माणसाला भेटतात आणि यानंतर सुरू होतो, ख-या अर्थाने थरकाप उडणारा खेळ.
तुम्हीही हा ट्रेलर पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.