अरबाजसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर जॉर्जिया अँड्रियानी म्हणते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 18:43 IST2020-04-19T18:42:59+5:302020-04-19T18:43:43+5:30

बॉलिवूडच्या सर्वांत हॉट जोडयांपैकी एक असलेली अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांची जोडी. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी नातं तयार झालं.

Georgia Andriani says marriage discussions with Arbaaz…. | अरबाजसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर जॉर्जिया अँड्रियानी म्हणते....

अरबाजसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर जॉर्जिया अँड्रियानी म्हणते....

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक लग्नं देखील पुढे ढकलली आहेत. मात्र, बॉलिवूडचं एक कपल म्हणे लॉकडाऊननंतर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समजतंय. आता तुम्ही म्हणाल कोण आहे हे जोडपं? बॉलिवूडच्या सर्वांत हॉट जोडयांपैकी एक असलेली अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांची जोडी. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी नातं तयार झालं. मागील दोन वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकत्याच झालेल्या एक मुलाखतीत जॉर्जियालाच लॉकडाऊननंतर तुम्ही लग्न करणार अशा चर्चा आहेत. अरबाजसोबत लग्नाचा काय प्लान आहे असा प्रश्न विचारण्यात आला आणि ती सुद्धा यावर मनमोकळेपणानं बोलली.

 इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये जॉर्जियानं सांगितलं की,‘अरबाजसोबतच लग्नाच्या सुरू असलेल्या चर्चांमुळे मला काहीही फरक पडत नाही. या अफवा जेव्हा तुमचं नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तीशी जोडलं जातं तेव्हा आपोआपच सुरू होता. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीशी मैत्री करता त्यावेळी तुम्ही त्याची प्रसिद्धी स्वीकारणं अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला या अफवांचा फार काही फरक पडत नाही. आम्ही अद्याप लग्नाचा कोणताही प्लान केलेला नाही.

जॉर्जिया एकीकडे लग्नाची बातमी फेटाळून लावत असताना दुसरीकडे तिचं कुटुंब इटलीमध्ये खूप कठिण परिस्थितीचा सामना करत आहे. आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना जॉर्जिया म्हणाली, सर्वांची तब्येत तर ठिक आहे. मात्र कोरोना व्हायरसनं सर्व काही संपवलं आहे. सध्या जो प्रकार इटलीमध्ये चालू आहे ते पाहता पुढचं वर्षभर तरी मी माझ्या कुटुंबाला भेटू शकत नाही. मला वाटतं जेव्हा जगातलं लॉकडाऊन संपेल तेव्हा मी जाऊन माझ्या कुटुंबाला भेटावं आणि त्यांच्यासोबत काही काळ राहावं.’

Web Title: Georgia Andriani says marriage discussions with Arbaaz….