जेनिलिया डिसूझाचा फॅशनचा जलवा, तिला पाहताच रितेश देशमुखही झाला फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:46 IST2019-08-27T15:42:55+5:302019-08-27T15:46:09+5:30

तिचा हा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहून नेटीझन्सेही तिने परत बॉलिवूडमध्ये कमबॅक करावे अशा प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Genelia D'souza's adorable Ramp walk pics at LFW 2019 will leave you spell bound | जेनिलिया डिसूझाचा फॅशनचा जलवा, तिला पाहताच रितेश देशमुखही झाला फिदा

जेनिलिया डिसूझाचा फॅशनचा जलवा, तिला पाहताच रितेश देशमुखही झाला फिदा

अभिनेत्री जेनिलिया डिसूझासह रितेश देशमुखच्या आनंदाला उधाण आलंय कारण तब्बल पाच वर्षानंतर जेनिलियाने रॅम्पवॉक करत सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या होत्या. रॅम्पवर जेनिलियाला पाहतचा रितेश देशमुखच्याही नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. तिने रॅम्पवर एंट्री करताच सा-यांनच्याच नजरा फक्त आणि फक्त जेनिलियावरच खिळल्या होत्या. ट्रेडिशनलूकमध्येही जेनिलियाच्या विविध अदांनी सा-यांनाच वेड लावले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

 

रॅम्पवॉकचे जेनिलियाचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच तिच्या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहून नेटीझन्सेही तिने परत बॉलिवूडमध्ये कमबॅक करावे  अशा प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली असल्याचे पाहायला मिळत आहे.

३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश-जेनिलिया रेशीमगाठीत अडकले. या दोघांचं दोनदा लग्न झालं. आधी हिंदू पद्धतीने मग ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं शुभमंगल थाटात पार पडलं. जेनेलियाने लग्नानंतर चित्रपटांतून ब्रेक घेतला आणि ती पूर्णपणे संसारात रमली. आता पाच वर्षांनंतर रॅम्प वॉकवर जेनेलियाचा जलवा पाहायला मिळाला. रॅम्पवर जेनेलियाला पाहून रितेशसुद्धा भारावून गेला होता.हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा या जोडीकडे पाहिलं जातं.  'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलीवुड पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. 

Web Title: Genelia D'souza's adorable Ramp walk pics at LFW 2019 will leave you spell bound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.