"आम्हा सगळ्यांच्या लाडक्या..." सासूबाईंसाठी जिनिलिया देशमुखची खास पोस्ट, व्यक्त केलं प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:41 IST2025-10-10T11:39:13+5:302025-10-10T11:41:51+5:30
देशमुखांची सून जिनिलिया ही केवळ एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर प्रेमळ पत्नी, आई आणि एक संस्कारी सून देखील आहे.

"आम्हा सगळ्यांच्या लाडक्या..." सासूबाईंसाठी जिनिलिया देशमुखची खास पोस्ट, व्यक्त केलं प्रेम!
Genelia Emotional Post For Vaishali Deshmukh: लोकप्रिय बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री जिनिलिया मराठमोळ्या रितेश देशमुखच्या प्रेमात पडली आणि महाराष्ट्राची सून झाली. जिनिलियाने आपल्या वागण्याने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या नुसत्या हसण्यावर चाहते फिदा आहेत. रितेश आणि जिनिलिया हे सध्या एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. जिनिलियाचं एक चांगली पत्नी आणि आई म्हणून तर नेहमीच कौतूक होतं. पण, यासोबतचं ती एक चांगली सूनदेखील आहे. जिनिलियाचं तिच्या सासूबाई म्हणजचे वैशाली देशमुख यांच्याशीही जिनिलियाचं एक खूप छान नातं आहे. जिनिलिया सासूबाईंना आई म्हणते तर वैशाली देखील तिचे मुलीप्रमाणे लाड करतात. जिनिलियाने सासूबाईंना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
आज वैशाली देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिनिलियाने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. जिनिलियाने वैशाली यांचे खास दोन फोटो फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत वैशाली यांच्याभोवती देशमुख कुटुंबातील लहानग्यांनी गराडा घातलेला दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत मुलांसोबत जिनिलिया आणि रितेश वैशाली यांच्याजवळ बसलेली दिसत आहेत. या फोटोसोबत जिनिलियानं लिहलं, "आम्हा सगळ्यांच्या लाडक्या….आजीमा, आई!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या!! आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो". जिनिलियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
रितेश आणि जिनिलिया यांनी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. तर लग्नाच्या आधी जवळपास १० वर्षे ते एकमेंकाना डेट करत होते. या जोडीला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली जिनिलिया जेव्हा देशमुख कुटुंबात सून म्हणून आली. तेव्हापासून ती रितेशची पत्नी नाही तर देशमुख कुटुंबाच्या सून म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आली आहे. तिनं मराठी संस्कृती, परंपरा या सगळ्या गोष्टी मोठ्या आवडीने शिकून घेतल्यात. ती प्रत्येक मराठी सण देखील हौसेने साजरे करते.