"प्रिय रियान, असं वाटतंय की..." जिनिलियाची मोठ्या लेकासाठी पोस्ट; वाचून तुमचेही डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:44 IST2025-11-25T14:44:30+5:302025-11-25T14:44:45+5:30
जिनिलियानं भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

"प्रिय रियान, असं वाटतंय की..." जिनिलियाची मोठ्या लेकासाठी पोस्ट; वाचून तुमचेही डोळे पाणावतील
Genelia Deshmukh Birthday Post For Son : महाराष्ट्राचं पावर कपल रितेश आणि जिनिलिया देशमुख नेहमीच आदर्श नात्याचे उदाहरण राहणार आहेत. या दोघांना महाराष्ट्रात लाडके दादा-वहिनी ओळखले जाते. त्यांना चाहत्यांकडून नेहमीच प्रेम आणि माया मिळत असते. रितेश आणि जिनिलिया यांना रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. ज्यांच्यावर खूप चांगले संस्कार आहेत. आज त्यांचा मोठा मुलगा रियान याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जिनिलियानं भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तिचे मातृत्व आणि मुलावरील प्रेम ओसंडून वाहत आहे.
जिनिलियाने रियान बरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "प्रिय रियान... असं वाटतंय की जणू कालच आपण तुझा पहिला वाढदिवस साजरा केला होता आणि आज तू अकरा वर्षांचा होत आहेस. तू मोठा होत आहेस, स्वतःचे निर्णय घेऊ शकतोस, तुला कोणता मार्ग घ्यायचा हेही तू तू ओळखतोस. आता मला जाणवतंय की, तुला माझी लागणारी गरजही आता थोडी कमी होत आहे".
पुढे तिनं लिहलं, "मला सर्वात जास्त काय आवडतं माहितीय का, रियान? हे सगळे बदल होऊनही, तू मागे वळून पाहतोस… क्षणभर थांबतोस… फक्त इतकं पाहण्यासाठी की मी अजूनही तुझ्या छोट्याशा जगाचा एक भाग आहे की नाही आणि माझ्यासाठी त्यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही. माझ्या आयुष्यात असा एक मुलगा आहे, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते आणि तो मला "आई" म्हणतो, हेच माझं भाग्य".
पोस्टच्या शेवटी लिहलं, "मी तुझी सगळ्यात मोठी चाहती असेन आणि कदाचित तुझी सगळ्यात मोठी टीकाकारही मीच असेन. पण मी नेहमी तुझी आई राहीन. जिला फक्त एवढंच हवंय की तिच्या या मुलानं आपल्या आयुष्यात सर्वोत्तम बनावं. बाकी मला काही महत्त्वाचं नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या बाळा", या शब्दात जिनिलियानं आपल्या लाडक्या लेकावरील प्रेम व्यक्त केलं. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रियानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.