OMG! रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजाकडे आहे ‘डबल गुड न्यूज’, घरी पुन्हा हलणार पाळणा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 13:35 IST2022-02-04T13:33:41+5:302022-02-04T13:35:39+5:30
Riteish Deshmukh, Genelia D'Souza post: सोशल मीडियावर रितेश भाऊ अन् जेनेलिया वहिनी किती लोकप्रिय आहेत, हे सांगायला नकोच. आता या जोडीनं शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.

OMG! रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजाकडे आहे ‘डबल गुड न्यूज’, घरी पुन्हा हलणार पाळणा!!
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व पत्नी जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza Deshmukh) हे बॉलिवूडचं लाडकं कपल. सोशल मीडियावर रितेश भाऊ अन् जेनेलिया वहिनी किती लोकप्रिय आहेत, हे सांगायला नकोच. आता या जोडीनं शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.
होय, जेनेलियाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने रितेशचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत रितेश चक्क बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतोय. अन्य एका फोटोत रितेश आणि जेनेलिया दोघंही बेबी बम्पसोबत दिसत आहेत. आता ही काय नवी भानगड? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तर रितेश व जेनेलिया या जोडीचा नवा चित्रपट येत्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy First Look)असं या चित्रपटाचं नाव आहे. शाद अली हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून हा एक कॉमेडी सिनेमा असणार आहे.
A twisted laughter ride and story like never seen before. Get ready to laugh your heart out and till your stomach hurts 🎭#MisterMummy@Riteishd#ShaadAli@TSeries#BhushanKumar#KrishanKumar@HecticCinema@bagapath#ShivChananapic.twitter.com/nyVvEZAXe9
— Genelia Deshmukh (@geneliad) February 4, 2022
या चित्रपटाच्या निमित्ताने जेनेलिया व रितेश ही जोडी दीर्घकाळानंतर पडद्यावर एकत्र दिसणार आहे. 12 वर्षांनंतर ही जोडी एकत्र काम करणार आहे.
कालच रितेश व जेनेलियाने लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्तने सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना मजेशीर अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यादरम्यान टी-सीरिजच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलने रितेश व जेनेलियाला टॅग करत एक फनी पोस्ट शेअर केली होती. ‘हमने सुना है कुछ गुड न्यूज है?’, असं ट्विट टी-सीरिजने केलं होतं. या ट्विटला जेनेलियानेही मजेशीर उत्तर दिलं होतं. ‘मिस्टर से पूछती हूं, अभी बता दें?’, असं तिने लिहिलं होतं. यावर ‘अरे मेरे बच्चों की मम्मी रूक जा, कल बता देते हैं,’ असं रितेशने लिहिलं होतं.
ही गुड न्यूज मुळातच ‘मिस्टर मम्मी’ या सिनेमाची होती.