जिनिलिया आणि रितेशच्या मुलांनी 'असं' साजरं केलं रक्षाबंधन, पाहा फोटो अन् व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:40 IST2025-08-10T12:25:02+5:302025-08-10T12:40:08+5:30
देशमुखांच्या घरचं रक्षाबंधन!

जिनिलिया आणि रितेशच्या मुलांनी 'असं' साजरं केलं रक्षाबंधन, पाहा फोटो अन् व्हिडीओ
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा एक महत्त्वाचा सण आहे. जो श्रावण पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्यासाठी प्रेम, संरक्षण आणि सुखाची प्रार्थना करते. हा सण केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून, भावंडांमधील विश्वास, जिव्हाळा आणि आनंदाचा उत्सव आहे. काल शनिवारी (८ ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी त्यांच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. जिनिलिया व रितेश देशमुख यांच्या घरीही रक्षाबंधनचा सण साजरा झाला. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
यंदाचा रक्षाबंधनाचा सण देशमुख कुटुंबानं नेहमीप्रमाणे जल्लोषात साजरा केला. जिनिलियानं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रक्षाबंधन सणाची खास झलक दाखवली. ज्यात हाताने बनवलेल्या राख्या, मिठाई, गिफ्ट्स पाहायला मिळाले. यासोबतच दीपशिखा देशमुख यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात दिवीयाना ही रितेश-जिनिलीयाची मुलं रियान आणि राहिल, तसेच देशमुख कुटुंबातील इतर भावंडांचं औक्षण करताना दिसते. या पोस्टवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
देशमुखांच्या घरात प्रत्येक मराठी सण मोठ्या आनंदाने साजरा केले जातात. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही लग्नानंतर तिने मराठी सण, परंपरा या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. अभिनेत्री होळी असो किंवा गणपती प्रत्येक सण उत्साहात साजरा करते. दरवर्षी रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं धिरज व दीपशिखा यांची मुलगी दिवीयानाबरोबर रक्षाबंधन साजरा करतात. देशमुखांच्या घरात सगळ्या भावांना दिवीयाना राखी बांधते. कारण, रितेशचे मोठे बंधू अमित देशमुख यांनाही दोन मुलं आहेत.