शाहरुखने कधी धोका दिला तर..? गौरी खानने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली- "मी सुद्धा मग.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:15 IST2025-05-14T16:13:47+5:302025-05-14T16:15:05+5:30
शाहरुखने कधी विश्वासघात केला तर? गौरी खानने दिलं खास उत्तर. त्यामुळे करण जोहरची बोलतीच झाली होती बंद

शाहरुखने कधी धोका दिला तर..? गौरी खानने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली- "मी सुद्धा मग.."
अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलं आहे. शाहरुखच्या आजवरच्या करिअरमध्ये त्याची पत्नी गौरी खानचाही मोठा वाटा आहे. शाहरुख आणि गौरीने (gauri khan) आजवरचं आयुष्य एकमेकांच्या साथीने छान जगलंय. संसारात अनेक चढ-उतार पाहिलेत पण एकमेकांची साथ सोडली नाही. अशातच गौरीला शाहरुखबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. शाहरुखने कधी धोका दिला तर काय करशील? या प्रश्नावर गौरीने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
शाहरुखने विश्वासघात केला तर?
झालं असं की, २००५ साली गौरी खान करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करणने गौरीला विचारलं की, शाहरुखने कधी विश्वासघात केला तर तू काय करशील? याशिवाय शाहरुखच्या महिला चाहत्यांकडून त्याला इतकं प्रेम मिळतं तर तुला कधी असुरक्षित वाटतं का? यावर गौरी म्हणाली, "मला या प्रश्नांचा राग येतो. जेव्हा लोक मला हा प्रश्न विचारतात तेव्हा मला खरंच चीड येते. पण तू आहेस म्हणून मी याचं उत्तर देते."
"मी रोज देवाजवळ प्रार्थना करते की, जर शाहरुखला माझ्यासोबत राहायचं नसेल तर परमेश्वराकडे मागणं असेल की, मलाही दुसरा कोणीतरी व्यक्ती शोधून दे. मी आशा करते की तो व्यक्ती हँडसम असेल. खरंच मी देवाजवळ अशी प्रार्थना करते. जर शाहरुखला दुसऱ्या कोणा व्यक्तीसोबत राहायचं असेल तर मी त्याच्यासोबत राहणार नाही. ठीक आहे, चांगलंय, असंच मी म्हणेल. त्यानंतर मी सुद्धा वेगळ्या व्यक्तीसोबत मूव्ह ऑन होईल", अशाप्रकारे गौरीने स्पष्टपणे या प्रश्नाचं उत्तर दिलं.