"जेवणात एखादा केस किंवा कीटक दिसूच शकतो..." गौरी खानच्या रेस्टॉरंटच्या सह-संस्थापकाचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:09 IST2025-08-21T18:09:33+5:302025-08-21T18:09:58+5:30
अनेक रेस्टॉरंट्स अशी असतात जिथे...

"जेवणात एखादा केस किंवा कीटक दिसूच शकतो..." गौरी खानच्या रेस्टॉरंटच्या सह-संस्थापकाचं विधान
अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने (Gauri Khan) काही दिवसांपूर्वी मुंबईत 'टोरी' (Torii) हे रेस्टॉरंट सुरु केलं. मध्यंतरी या रेस्टॉरंटबाबतीत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या रेस्टॉरंटमध्ये मिळणारं पनीर हे नकली असल्याचा व्हिडिओ एका कंटेंट क्रिएटरने केला होता. त्यावर रेस्टॉरंटने स्पष्टीकरणही दिलं होतं. आता रेस्टॉरंटच्या सह संस्थापकाचं एक विधान व्हायरल होत आहे. जेवणात एखादा कीटक, केस किंवा माशी दिसूच शकते असं ते म्हणाले आहे. त्यांच्या या विधानाने आता त्यांचा अडचणीत टाकलं आहे.
'तोरी'या रेस्टटॉरंची संस्थापक गौरी खान आहे. तर सहसंस्थापक अभयराज कोहली आहेत. 'पॉप डायरीज'या पॉडकास्टमध्ये त्यांनी रेस्टॉरंट्सच्या स्वच्छतेवर भाष्य केलं. ते म्हणाले, "अनेक रेस्टॉरंट्स अशी असतात जिथे फारशी स्वच्छता नसते. पण आमच्या हॉटेलमध्ये योग्य काळजी घेतली जाते. रेस्टॉरंटमधलं किचन किती स्वच्छ असतं हे पाहणं महत्वाचं नाही. तर स्वयंपाकासाठी वापरला जाणारा कच्चा माल कसा साठवला जातो ते ग्राहकांच्या डिशमध्ये सर्व्ह करेपर्यंत कशी काळजी घेतली जाते हे पाहणं गरजेचं आहे."
ते पुढे म्हणाले, "आमच्याकडे सुशी,साश्मी सारखे पदार्थ बनतात. यासाठी कच्चे मांस लागते. हे मांस सुपरफ्रीजर मध्ये साठवले जाते. हे सुपर फ्रीजर मायनस ६० ते मायनस ७० डिग्री तापमानापर्यंत थंड असतं. त्यात बॅक्टेरियाचा प्रसार होत नाही. पण बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये सुपरफ्रीजर नसतं. तसंच कधी कधी जेवणात एखादी माशी, कीटक किंवा केस दिसतो. हे स्वाभाविक आहे. हा या व्यवसायाचा भाग आहे. तुम्ही घरीही स्वयंपाक करता किंवा ऑफिसमध्ये असता तेव्हा डब्यात एखादा केस निघू शकतो. हे अगदीच होणार नाही असं होऊ शकत नाही."