गौहर म्हणते,‘नो ठुमकाज इन फिव्हर!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:42 IST2016-07-23T08:12:22+5:302016-07-23T13:42:22+5:30

 गौहर खान ही तिच्या डान्समुळेच विशेष करून ‘बी टाऊन’ मध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, तिचा आगामी थ्रिलरपट ‘फिव्हर’ मध्ये तिने ...

Gauhar says, 'No thumakaz in fiver!' | गौहर म्हणते,‘नो ठुमकाज इन फिव्हर!’

गौहर म्हणते,‘नो ठुमकाज इन फिव्हर!’

 
ौहर खान ही तिच्या डान्समुळेच विशेष करून ‘बी टाऊन’ मध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, तिचा आगामी थ्रिलरपट ‘फिव्हर’ मध्ये तिने एकाही गाण्यावर डान्स परफॉर्म केले नाही. त्याबद्दल बोलताना ती म्हणते,‘डान्सबद्दल तर विसराच. पण, मी कुठल्या गाण्यावर लिप्सिंग देखील केलेले नाही. तसेच चित्रपटाची ती डिमांड पण नाहीये.

हे तरी बरेय की, चित्रपटाच्या टीमने कुठले प्रमोशनल गाणे माझ्याकडून करवून घेतले नाही. लोकांना वाटत असेल की,‘गौहर हैं तो डान्स तो होगा ही.’ पण याबाबतीत लोकांचा भ्रमनिरास होणार आहे. चित्रपटात ११ गाणी आहेत. पण, आम्ही एकाही गाण्यात लिप्सिंग केले नाही. डान्स तर दुरचीच गोष्ट आहे. ही गाणी प्रसंगानुरूप घेण्यात आली आहेत. भूमिकांना डान्सिंगसाठी घेण्यात आलेच नव्हते.’

नुकतीच गौहरने ‘बेगम जान’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले आहे. तसेच विद्या बालन यात मुख्य भूमिकेत असून गौहरसोबत पल्लवी शारदा आणि प्रियंका सेटिया यांच्यासोबत ती शूटींग करते आहे.

Web Title: Gauhar says, 'No thumakaz in fiver!'