सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:36 IST2025-06-02T15:35:49+5:302025-06-02T15:36:45+5:30

गौहर खानने सुनील शेट्टीला चांगलंच सुनावलं

gauhar khan furious reaction on suniel shetty s statement about c section is easy way | सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."

सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."

अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लेक अथिया शेट्टीने काही महिन्यांपूर्वी लेकीला जन्म दिला. सुनील शेट्टीने आजोबा झाल्याचा आनंद साजरा केला. काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टीने महिलांच्या प्रसुतीबद्दल वक्तव्य केलं ज्यावरुन खूप टीका झाली. माझ्या लेकीने आरामदायक सी सेक्शनचा मार्ग न स्वीकारता नैसर्गिकरित्या प्रसुतीचा मार्ग स्वीकाला. या विधानानंतर वादाला तोंड फुटलं. दुसऱ्यांदा प्रेग्नंट असलेल्या गौहर खानने (Gauhar Khan) नुकतंच सुनील शेट्टीच्या वक्तव्यावरुन नाव न घेता सुनावलं आहे.

गौहर खानने 'मा'नोरंजन नावाने युट्यूब चॅनल सुरु केलं आहे.  यामध्ये ती तिच्या प्रेग्नंसी प्रवासाविषयी सांगताना दिसते. ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून आता तिचा पाचवा महिना सुरु आहे. यावेळी ती म्हणाली, "मला कळत नाही की नॉर्मल डिलीव्हरी होती की सी सेक्शन झालं हा एवढा मोठा मुद्दा का बनत चालला आहे. प्रत्येकालाच हे जाणून घ्यायचं आहे. दोन्ही सारखंच कठीण आहे आणि दोन्हीमधून तुम्हाला आई होण्याची सारखीच जाणीव येते. मला वाटतं हा एवढा मोठा मुद्दा नसावा."

ती पुढे म्हणाली, "नुकतंच एका सेलिब्रिटीनेच वक्तव्य केलं की सी सेक्शन हा जास्त सोपा मार्ग आहे. काय??? मला तर जोरात ओरडून विचारावं वाटतंय की तुम्ही असं म्हणूच कसं शकता? प्रेग्नंसीबद्दल किती गैरसमज आहेत. मला कळतच नाहीए मी याबद्दल काय बोलू. एका पुरुष सेलिब्रिटीने असं काहीतरी बोलणं हे अजिबातच पटलेलं नाही. जो स्वत: प्रेग्नंसीतून गेलेला नाही, ज्याच्या पोटात बाळ नाही, ज्याला माहितच नाही की सी सेक्शन किती वेदनादायी असू शकतं असा व्यक्ती हे बोलतोय."

"तुम्ही नॉर्मल डिलीव्हरी करणं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही महिला नॉर्मल डिलीव्हरी करु शकतात काही करु शकत नाहीत. याचा अर्थ हा नाही की जो सी सेक्शनचा मार्ग स्वीकारतो तो सोपा मार्ग असतो.  हे इतकं साधं आहे", असंही ती पुढे म्हणाली.

Web Title: gauhar khan furious reaction on suniel shetty s statement about c section is easy way