​गौहर खान अन् हर्षवर्धन राणे म्हणतात, आमच्यात काहीही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 12:16 IST2016-11-23T12:16:55+5:302016-11-23T12:16:55+5:30

गौहर खान आणि ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा हर्षवर्धन राणे यांच्या रोमान्सच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. ...

Gauhar Khan and Harshavardhana Rane said, we have nothing! | ​गौहर खान अन् हर्षवर्धन राणे म्हणतात, आमच्यात काहीही नाही!

​गौहर खान अन् हर्षवर्धन राणे म्हणतात, आमच्यात काहीही नाही!

हर खान आणि ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा हर्षवर्धन राणे यांच्या रोमान्सच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. कुशाल टंडनसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर गौहर व हर्षवर्धन यांच्यातील जवळीक जरा जास्तच वाढल्याची चर्चा आहे. मात्र खुद्द हर्षवर्धन आणि गौहर या दोघांनीही ही चर्चा खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. हर्षवर्धनने यावर एक मोठ्ठा खुलासाही लिहिला आहे. माझ्या व गौहरमधील रिलेशनशिपच्या बातम्या खोट्या आहेत. गौहर मला आवडत नाही, असे मी अजिबात म्हणणार नाही. ती कष्टाळू आहे. आत्मसन्मान जपणारी मुलगी आहे. त्यामुळे तिच्याबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर आहे. मात्र यापेक्षा आम्हा दोघांमध्ये काहीही नाही. आम्ही दोघेही परस्परांना डेट करीत असल्याची बातमी खोटी आहे, असा खुलासा त्याने केला आहे. मी अनेक रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे. पण या रिलेशनशिप पुढे गेल्या नाहीत, हेही त्याने मोकळेपणाने कबुल केले आहे.

केवळ हर्षवर्धनच नाही तर गौहरनेही रिलेशनशिपची चर्चा नाकारली आहे. माझ्यात आणि हर्षमध्ये काहीही नाही,असे तिने स्पष्ट केले आहे. केवळ एवढेच नाही तर आम्ही दोघांनी एकत्र बसून अद्याप कॉफीही घेतलेली नाही. सोबत कॉफीही घेतली नसताना डेटींग कसे होऊ शकते? असा सवालही तिने केला आहे.
एकंदर काय, तर हर्षवर्धन आणि गौहर या दोघांपैकी कुणीही त्यांच्यातील पे्रमसंबंध मानायला तयार नाही. आता खरे काय, हे त्या दोघांनाच ठाऊक पण त्यांनी दिलेले खुलाशा नंतर तरी विश्वास हा ठेवायलाच हवा.

kushal gauhar breakup : gauhar harshwardhan relationship

‘बिग बॉस’मध्ये गौहर आणि कुशान टंडन यांच्यात प्रेम बहरले होते. यानंतर दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अचानक त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी आली. सध्या कुशाल छोट्या पडद्यावर बिझी आहे. तर गौहर तिच्या अफेअर्सवर खुलासे देण्यात!!

Web Title: Gauhar Khan and Harshavardhana Rane said, we have nothing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.