Ganesh Chaturthi 2019 : सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:16 IST2019-09-02T11:14:23+5:302019-09-02T11:16:19+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले. अनेक सेलिब्रिटींनी शूटिंगपासून ब्रेक घेत, बाप्पांचे स्वागत केले.

Ganesh Chaturthi 2019 : सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन, पाहा फोटो
देशभर बाप्पाच्या आगमनाची धामधूम सुरु आहे. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीसुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले. अनेक सेलिब्रिटींनी शूटिंगपासून ब्रेक घेत, बाप्पांचे स्वागत केले. सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा पाहा, तर आपल्या लाडक्या सेलिब्रिटीच्या घरचा लाडका बाप्पा...
शिल्पा शेट्टीने बाप्पाचे उत्साहात स्वागत केले.
अभिनेता विवेक ओबेराय याच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले.
अभिनेता संजय दत्त याच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले. संजयच्या मुलाने यावेळी बाप्पाचे स्वागत केले.
अभिनेता सोनू सूद यानेही उत्साहात बाप्पाचे स्वागत केले.
मुकेश अंबानींचे घर बाप्पांच्या आगमनासाठी असे सजले.