'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सनी देओलचा चित्रपट लवकरच पार करणार 300 कोटींचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:54 AM2023-08-18T09:54:21+5:302023-08-18T09:57:04+5:30

‘गदर २’ हा बॉलिवूड सिनेमा रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

Gadar 2 box office collection day 7 sunny deol film earn 22 crores on thursday close to 300 cr india net | 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सनी देओलचा चित्रपट लवकरच पार करणार 300 कोटींचा आकडा

'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सनी देओलचा चित्रपट लवकरच पार करणार 300 कोटींचा आकडा

googlenewsNext

बहुचर्चित ‘गदर २’ हा बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासूनच ‘गदर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, यासोबतच 'गदर 2' रोज नवं विक्रम करत आहे. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई करतोय. रिलीजच्या 7 दिवसानंतरही हा ट्रेंड थांबलेला नाही.

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ तूफान कमाई करतो आहे. अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने २५० कोटीहुन  अधिक कमाई केली होती. ७ व्या दिवशीही सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ७ दिवसाचे  सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. 

सनी देओलच्या 'गदर 2' ची जादू जितकी भारतात आहे तितकी परदेशात दिसून येत नाही. भारतात 'गदर २' पहिल्याच दिवशी तब्बल 40.10 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.70 कोटी, चौथ्या दिवशी 38.70 कोटी, पाचव्या दिवशी 55.50 कोटी आणि सहाव्या दिवशी 33.50 कोटी रुपयांची कमाई केली. तर सातव्या दिवशी २२ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 'गदर 2' चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 283.35 कोटींची कमाई केली आहे. 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे आणि चित्रपट आता 300 कोटी क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पाऊल दूर आहे. या वीकेंडला चित्रपट हा आकडा पार करेल असा अंदाज आहे. 

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 हा 2001 मध्ये रिलीज झालेल्या गदरचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 
---

Web Title: Gadar 2 box office collection day 7 sunny deol film earn 22 crores on thursday close to 300 cr india net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.