तारा सिंगच्या 'गदर २' ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, सनी देओलचा सिनेमाने ११ व्या दिवशी केली इतकी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:23 IST2023-08-22T12:19:05+5:302023-08-22T12:23:02+5:30
. गदर 2 चे अकराव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

तारा सिंगच्या 'गदर २' ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, सनी देओलचा सिनेमाने ११ व्या दिवशी केली इतकी कमाई
11 ऑगस्ट रोजी रिलीज झाल्यानंतर आता पहिल्यांदाच सनी देओल स्टारर चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाने आठवड्याच्या दिवसातही चांगली कमाई केली आहे. 'गदर 2'ला रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहेत. चित्रपट आता 400 कोटी क्लबमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. तारा सिंग आणि सकिना यांची केमिस्ट्री लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. गदर 2 चे अकराव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
'गदर 2'च्या यशाने सर्वांचीच बोलती बंद केली. . २००१ साली ज्याप्रकारे 'गदर'ने इतिहास घडवला होता. अगदी तसाच प्रतिसाद 'गदर' च्या सिक्वलला मिळताना दिसतोय. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपट प्रेक्षकांचा ऐवढा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
सकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गदर 2' ने 11 व्या दिवशी सुमारे 14 कोटी कमावले आहेत. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 389.10 कोटी झाले आहे. त्यामुळे आता लवकरच हा सिनेमा 400 कोटींचा आकडा सहजपणे पार करणार आहे.
'गदर 2' चा धुमाकूळ बघता इतक्यात तरी बॉक्सऑफिसचे आकडे कमी होतील असं वाटत नाही. 'गदर 2' हिट होण्याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर लोकांसाठी ते एक इमोशन आहे. तसंच मेकर्सने जून महिन्यात 'गदर एक प्रेम कथा' पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज केला होता. याचाही सिनेमाला फायदा झाला. सध्या प्रेक्षकांमध्ये केवळ सनी पाजीची क्रेझ दिसून येतेय.