‘फुकरे रिटर्न्स’मुळे ऋचा चढ्ढाचे नशिब फळफळले; एक रात्रीसाठी मिळाली एवढ्या कोटींची आॅफर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:24 IST2017-12-27T09:53:17+5:302017-12-27T15:24:08+5:30
‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटात अतिशय दमदार आणि बोल्ड अंदाजात दिसलेली बोल्ड अभिनेत्री भोली पंजाबन ऊर्फ ऋचा चढ्ढा हिचे नशिब ...

‘फुकरे रिटर्न्स’मुळे ऋचा चढ्ढाचे नशिब फळफळले; एक रात्रीसाठी मिळाली एवढ्या कोटींची आॅफर!
‘ ुकरे रिटर्न्स’ या चित्रपटात अतिशय दमदार आणि बोल्ड अंदाजात दिसलेली बोल्ड अभिनेत्री भोली पंजाबन ऊर्फ ऋचा चढ्ढा हिचे नशिब सध्या जोमात असल्याचे दिसून येत आहे. ‘फुकरे रिटर्न्स’मुळे ऋचाचे भाव वाढले असून, तिला न्यू इअर नाइटसाठी तब्बल एक कोटी रुपये आॅफर केले गेल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार ऋचाला न्यू इअर नाइटसाठी तीन शो आॅफर करण्यात आले. प्रत्येक शो करिता तिला तब्बल एक कोटी रुपयांची आॅफर दिली गेली. या शोमध्ये ऋचा भोली पंजाबनच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन करताना बघावयास मिळणार आहे.
ऋचाचे हे तिन्ही शो लुधियाना, मेरठ आणि जयपूरमध्ये होणार आहेत. ऋचाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले की, ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’नंतर ऋचाचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. लोकांना तिचा भोली पंजाबनचा अंदाज भावत आहे. वास्तविक भोली पंजाबन ही भूमिका अतिशय धाकड असून, तिचा हाच अंदाज लोकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान ‘फुकरे रिटर्न्स’च्या यशानंतर ऋचा सध्या सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘दासदेव’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भोली पंजाबनच्या भूमिकेनंतर या चित्रपटात ऋचा ‘पारो’च्या भूमिकेत झळकणार आहे.
![]()
दरम्यान, गेल्या काळापासून ऋचा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषण होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते. त्याचबरोबर काही नावांचा खुलासा केल्यास माझ्या जिवाला धोका निर्माण होईल, असेही ती बोलली होती. ऋचाच्या या खुलाशानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती. अनेकांनी तर तिला नावांचा खुलासा केला जावा असे म्हटले होते.