सिमर दुग्गलचे निधन; मलायका अरोराने गमावली बेस्ट फ्रेन्ड, रडून रडून अशी झाली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 12:38 IST2020-08-13T12:37:23+5:302020-08-13T12:38:13+5:30

पूर्वाश्रमीची मॉडेल आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर सिमर दुग्गल हिचे बुधवारी कॅन्सरने निधन झाले.

former model and designer simar dugal passes away celebs malaika-arora mourn the demise | सिमर दुग्गलचे निधन; मलायका अरोराने गमावली बेस्ट फ्रेन्ड, रडून रडून अशी झाली अवस्था

सिमर दुग्गलचे निधन; मलायका अरोराने गमावली बेस्ट फ्रेन्ड, रडून रडून अशी झाली अवस्था

ठळक मुद्देमलायकाशिवाय श्वेता बच्चन, सोफी चौधरी, डिझाईनर विक्रम फडनीस यांनीही सिमरच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

पूर्वाश्रमीची मॉडेल आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर सिमर दुग्गल हिचे बुधवारी कॅन्सरने निधन झाले. सिमरच्या निधनाचे वृत्त येतात बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सिमर ही त्या निवडक मॉडेल्सपैकी एक आहे, ज्यांनी स्टीरियोटाईप तोडला आणि लग्नानंतर रॅम्प गाजवला.

सिमरच्या निधनावर तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री मलायका अरोराची तर रडून रडून वाईट अवस्था झालीय. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘मी अश्रू रोखू शकत नाहीये. माझी सुंदर मैत्रिण, माझी एंजल, माझी खंबीर सहकारी... खूप खूप प्रेम. तुझी खूप आठवण येईल,’ असे मलायकाने लिहिले आहे.
मलायकाशिवाय श्वेता बच्चन, सोफी चौधरी, डिझाईनर विक्रम फडनीस यांनीही सिमरच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

Web Title: former model and designer simar dugal passes away celebs malaika-arora mourn the demise