रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 11:14 IST2020-08-06T11:13:39+5:302020-08-06T11:14:17+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत.

रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्युवरून राजकारण तापले आहे. रोज नवे खुलासे होत आहेत. आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही सुरु आहे. अशात बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. रियाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
मुंबई पोलिस अंडरवर्ल्डच्या इशा-यावर काम करत असून यामुळेच बिहार पोलिसांना मैदानात उतरावे लागले, असा दावाही त्यांनी यावेळी केला. रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोपही मांझी यांनी केला. हा आरोप त्यांनी कुठल्या आधारावर केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान बिहारातील जनअधिकार पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू यादव यांनीही रियाचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे म्हटले आहे.
सुशांतच्या वडिलांनी रिया व तिच्या कुटुंबीयांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रियावर सुशांतला ब्लॅकमेल करण्याचा, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा, खंडणीचा आरोप केला आहे. तूूर्तास सुशांत प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.