सनी, मलायका यांना विसरा, ही आहे सर्वात बोल्ड अभिनेत्री, पाहा तिचा नवीन अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 14:25 IST2019-10-09T14:21:17+5:302019-10-09T14:25:43+5:30

या हॉट आणि सेक्सी फोटोंवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.

Forget Sunny Leone, Malaika Arora this is the Boldest Actress Ileana D'Cruz In Bollywood | सनी, मलायका यांना विसरा, ही आहे सर्वात बोल्ड अभिनेत्री, पाहा तिचा नवीन अंदाज

सनी, मलायका यांना विसरा, ही आहे सर्वात बोल्ड अभिनेत्री, पाहा तिचा नवीन अंदाज


ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्श झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. तिच्या मादक अदांनी नेटिझन्सना तिने अक्षरक्ष: वेड लावलं आहे. बॉलीवुडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे आहेत फ्लॉप. ती आहे बोल्ड तसंच हॉट इलियाना डिक्रूझ. 'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी  इलियाना डिक्रूझ नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचे लाखोंच्या संख्येने फॉलोव्हर्स आहेत. 

नुकताच तिने एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. यात ती टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.  या हॉट आणि सेक्सी फोटोंवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. याशिवाय स्वतःचे बोल्ड व्हिडिओ शेअर करून इलियाना सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. 

बीचवर हॉट बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे. इलियानाने हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. तर अनेकांनी तिच्या या हॉट लुकचं कौतुक केलं आहे.  बिकिनी किंवा हॉट फोटो शेअर करण्याची ही इलियानाची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा तिनं असेच बिकिनी फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे इलियानाच्या बोल्डनेस अंदाजामुळेच तिची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जात आहे. 

Web Title: Forget Sunny Leone, Malaika Arora this is the Boldest Actress Ileana D'Cruz In Bollywood