‘पद्मावत’मधील ‘घूमर’वर विदेशी मुलींनी धरला ठेका; डान्स बघून तुम्ही थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 20:56 IST2018-01-31T15:26:44+5:302018-01-31T20:56:44+5:30
‘पद्मावत’मधील घूमर हे गाणे केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही लोकप्रिय होताना दिसत आहे. या गाण्यावर विदेशी मुलींनी ठेका धरत एकच जल्लोष केला.

‘पद्मावत’मधील ‘घूमर’वर विदेशी मुलींनी धरला ठेका; डान्स बघून तुम्ही थक्क व्हाल!
ब लिवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही प्रचंड लोकप्रिय ठरत असताना दिसत आहे. चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेले ‘घूमर’ हे गाणे केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही लोकप्रिय ठरताना दिसत आहे. होय, नुकतेच या गाण्यावर चक्क आंतरराष्ट्रीय मंचावर विदेशी कलाकार ठेका धरताना बघावयास मिळाले. विदेशी डान्सरनी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सर्व स्टेप्स जशास तशा फॉलो करताना जबरदसत ठुमके लावले. सध्या विदेशी कलाकारांचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, दीपिकाने एनबीएच्या आॅफिशियल सोशल साइट्सवर अपलोड असलेला व्हिडीओ शेअर केला.
दरम्यान, ‘पद्मावत’ रिलीज होण्याअगोदर ‘घूमर’ गाणे एडिट करून त्याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केला होता. करणी सेनेने चित्रपटाला विरोध केल्यामुळेच या गाण्यात बदल करावे लागले. खरं तर हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. परंतु विरोधामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. चित्रपटातील बहुतांश दृश्यांना कात्री लावल्यानंतर अखेर २५ जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर धमाल करीत आहे. आता तर या चित्रपटाची लोकप्रियता विदेशातही दिसून येत आहे.
एनबीएच्या डान्सिंग टीममधील जवळपास एक डझनपेक्षा अधिक विदेशी गर्ल्सनी पर्पल रंगाच्या लहेंग्यात या गाण्यावर ठुमके लावले. सर्वांनी या गाण्यावर थिरकताना दीपिकाच्या प्रत्येक स्टेप फॉलो केल्या. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा डान्स एनबीए बास्केटबॉलमध्ये शार्लेट हॉर्नेट्स आणि मियामी यांच्यात झाला. एनबीएच्या आॅफिशियल अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत चार हजारांपेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चाही रंगल्याचे दिसून येत आहे.