​रजनीकांत ट्विटरवर करतो केवळ दोघांना फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 19:46 IST2016-07-23T14:16:33+5:302016-07-23T19:46:33+5:30

साऊथचा  सुपरस्टार रजनीकांतचे ३० लाखाहून अधिक ट्विटर अकाऊंटवर  चाहते आहेत.  त्यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी व बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनचा ...

Follow Rajinikanth on Twitter | ​रजनीकांत ट्विटरवर करतो केवळ दोघांना फॉलो

​रजनीकांत ट्विटरवर करतो केवळ दोघांना फॉलो


/>साऊथचा  सुपरस्टार रजनीकांतचे ३० लाखाहून अधिक ट्विटर अकाऊंटवर  चाहते आहेत.  त्यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी व बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनचा समावेश आहे.  त्याचे कार्यालयीन ट्विटर अकाऊंट पीएमओ इंडिया व बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन असे आहे. ही दोघे व न्युज वेबसाईट्स असे तो फक्त १९ जणांना फॉलो करतो. 

‘कबाली ’या चित्रपटामुळे रजनीकांतने पुन्हा चित्रपटसृष्टीसह सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची ही कबाली तेलगू, हिंदी, इंगजीसह अन्य भाषांमध्ये अनेक देशात प्रदर्शित झाली. दक्षिण भारतामध्ये या चित्रपटामुळे सर्वांनाच वेड लावले आहे.  बॉक्स आॅफिसवर १०० टक्के कलेक्शनचा रेकॉर्ड दक्षिण भारतात कबालीने कायम केला आहे. या चित्रपटात राधिका आप्टे, धंसिका, दिनेश, कलायरसन, ऋतविका व विंस्टनसह अनेक नवे कलाकार आहेत. यामध्ये रजनीकांत डॉनच्या  भूमिकेत असून, तो मलेशियामध्ये तामिळ लोकांकरीता समान वेतनाचा लढा देत असल्याचे दाखविण्यात आले आहे. 

Web Title: Follow Rajinikanth on Twitter