​सेन्सॉर बोर्डाकडून लीक झालेला ‘उडता पंजाब’ झाला ७० हजार वेळा डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 15:29 IST2016-06-17T09:59:15+5:302016-06-17T15:29:15+5:30

सेन्सॉर बोर्डाशी न्यायालयीन लढा देत ‘उडता पंजाब’ अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स आॅफिसवर विपरीत परिणाम होण्यासाठी या चित्रपटाचे ...

'Flying Punjab' leaked by the censor board downloaded 70 thousand times | ​सेन्सॉर बोर्डाकडून लीक झालेला ‘उडता पंजाब’ झाला ७० हजार वेळा डाऊनलोड

​सेन्सॉर बोर्डाकडून लीक झालेला ‘उडता पंजाब’ झाला ७० हजार वेळा डाऊनलोड

न्सॉर बोर्डाशी न्यायालयीन लढा देत ‘उडता पंजाब’ अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स आॅफिसवर विपरीत परिणाम होण्यासाठी या चित्रपटाचे अनकट व्हर्जन इंटरनेटवर लीक झाले असून सेन्सॉर बोर्डाशी संबंधीत एखाद्या व्यक्तीने असे केल्याचा आरोप होत आहे.  इंटरनेटच्या लाइव्ह स्ट्रीमिंग वेबसाइटवर ७० हजार वेळा फिल्म अपलोड केली गेली होती. विविध राज्यातील अँटी पायरसी विंगला ७३२ वेबसाइटवर लीक झालेला चित्रपट सापडला आहे.

 चित्रपटाचे दोन व्हर्जन लीक झाले होते. पहिल्या व्हर्जनमध्ये पूर्ण २ तास २० मिनीटांचा चित्रपट होता. दुसरे व्हर्जन ४०  मिनीटांचे असल्याचे सांगण्यात येत असून यात सर्व वादग्रस्त सीन आहे. जे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितले होते. गुरुवारी हा चित्रपट लाखो लोकांनी डाऊनलोड केला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की लीक व्हर्जनमध्ये वॉटर मार्क दिसत आहे. फिल्म सेन्सॉर बोर्डमधूनच लीक झाल्याचा आरोप होत आहे.

Web Title: 'Flying Punjab' leaked by the censor board downloaded 70 thousand times