‘फ्लॉप’ही होऊ शकतो ४५० कोटींचा ‘हा’ चित्रपट! हे असेल कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 11:07 IST2018-01-02T05:37:59+5:302018-01-02T11:07:59+5:30
२०१८ मध्ये बॉक्सआॅफिसवर अनेक चित्रपटांचा संघर्ष अटळ दिसतोय. साहजिकच यामुळे चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होणे निश्चित आहे. विशेष म्हणजे, काही ...

‘फ्लॉप’ही होऊ शकतो ४५० कोटींचा ‘हा’ चित्रपट! हे असेल कारण!!
२ १८ मध्ये बॉक्सआॅफिसवर अनेक चित्रपटांचा संघर्ष अटळ दिसतोय. साहजिकच यामुळे चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होणे निश्चित आहे. विशेष म्हणजे, काही बिग बजेट चित्रपटांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ४५० कोटी रूपये खर्चून बनवण्यात आलेला एक चित्रपटही यामुळे अडचणीत येवू शकतो. हा चित्रपट कुठला तर रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा २.०. होय, रजनीकांत व अक्षय कुमारचा हा चित्रपट मोस्ट अवेटेड चित्रपटांमध्ये सामील आहे. मात्र या चित्रपटासोबत आणखी तीन चित्रपट रिलीज होत आहेत. याचा फटका या मेगा बजेट चित्रपटाला बसू शकतो.
बॉक्सआॅफिस संघर्षामुळे याआधी दोनदा ‘२.०’ ची रिलीज डेट पुढे ढकण्यात आली आहे. खरे तर ‘२.०’ हा चित्रपट या महिन्यात रिलीज होणार होता. असे झाले असते तर अक्षयच्याच ‘पॅडमॅन’सोबत ‘२.०’चा मुकाबला रंगला असता. हे टाळण्यासाठी चित्रपटाची तारीख एप्रिलपर्यंत पुढे ढकण्यात आली. पण एप्रिलमध्येही टायगर श्रॉफ स्टारर ‘बागी2’,कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका’ आणि ‘एवेंजर्स इन्फिनिटी वॉर’ असे तीन चित्रपट रिलीज होत असल्याने ‘२.०’च्या अडचणीत भर पडली आहे. ‘बागी’ आधीच हिट ठरला होता. आता त्याचा सीक्वल येतोय. ‘मणिकर्णिका’ही कंगनाचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. हॉलिवूड चित्रपट ‘एवेंजर्स इन्फिनिटी वॉर’चाही आपला एक खास प्रेक्षकवर्ग आहे. अशात ‘२.०’चा गल्ला प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ALSO READ : ‘हॉलिवूड’ने केली रजनीकांत यांची फसवणूक ! निर्माते करणार कायदेशीर कारवाई!!
‘२.०’ हा चित्रपट रजनीकांत यांच्याच २०१० मध्ये आलेल्या ‘रोबोट’चा सीक्वल आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर ऐश्वर्या राय-बच्चन लीड रोलमध्ये बघावयास मिळाली होती. या चित्रपटात रजनीकांत यांनीच नायक आणि खलनायकाची भूमिका साकारली होती. यावेळी खलनायकाच्या भूमिकेत अक्षयकुमार दिसणार असून, तो खूपच खतरनाक दाखविण्यात येणार आहे, तर रजनीकांत पुन्हा एकदा डॉक्टर वसीकरण आणि रोबोट चिट्टीच्या भूमिकेत असणार आहेत.