खलनायक रंजीत यांच्या प्रेमात वेडी होती ही अभिनेत्री, मेव्हणानेच केला पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 06:00 IST2019-08-30T06:00:00+5:302019-08-30T06:00:00+5:30

बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक अभिनेते रंजीत यांच्यावर बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं खूप प्रेम होतं.

flashback Simple Kapadia was madly in love with villain Ranjeet love story | खलनायक रंजीत यांच्या प्रेमात वेडी होती ही अभिनेत्री, मेव्हणानेच केला पत्ता कट

खलनायक रंजीत यांच्या प्रेमात वेडी होती ही अभिनेत्री, मेव्हणानेच केला पत्ता कट

अभिनेते रंजीत बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक होते. ते रुपेरी पडद्यावर खलनायक साकारायचे पण खऱ्या आयुष्यात मुली त्यांना घाबरायच्या. मात्र त्यांच्यावर एका अभिनेत्रीचं खूप प्रेम होतं. रंजीत यांच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडियाची बहिण सिंपल कपाडिया.

सिंपल रंजीतच्या प्रत्येक अदांवर फिदा होती. मग त्यांची हेअर स्टाईलपासून त्यांची बोलण्याची स्टाईल. मात्र या प्रेमकथेत एक ट्विस्टही होता. सिंपल कपाडियाचे जीजू म्हणजेच राजेश खन्ना यांना त्यांचं रिलेशन अजिबात आवडत नव्हतं.

राजेश खन्ना मेव्हणीच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते. असं म्हटलं जातं की राजेश खन्ना यांना रंजीत आवडत नव्हते. त्यांना सिंपल व रंजीत यांच्या जवळीकमुळे राग येत होता. पण त्यावेळी त्यांनी ही गोष्ट त्यांच्या मनातच दाबून ठेवली होती. पण, जेव्हा सिंपल व रंजीत यांच्या अफेयरच्या चर्चा सगळीकडे ऐकायला मिळाल्या तेव्हा राजेश खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली.


एकेदिवशी सिंपल रंजीत यांना भेटून खूप उशीरा घरी परतली होती. त्यावेळी राजेश खन्ना तिला खूप ओरडले. पण, त्याचा तसूभरही फरक सिंपलवर पडला नाही. द टेलीग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, छैला बाबू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिंपलमुळे राजेश खन्ना व रंजीत एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. असं सांगितलं जातं की शूटिंग दरम्यान त्या दोघांमध्ये खूप मतभेद झाले आणि या घटनेनंतर रंजीत व सिंपल कपाडिया यांच्या नात्यात दुरावा आला.


सिंपलने १९८७ साली कायमचं सिनेइंडस्ट्रीला राम राम केला आणि फॅशन डिझायनर म्हणून काम करू लागली होती. तिला रुद्राली चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. २००९ साली कर्करोगामुळे सिंपल कपाडियाचं निधन झालं.

Web Title: flashback Simple Kapadia was madly in love with villain Ranjeet love story