अनुष्काने शेअर केला न्यू इअरचा फर्स्ट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 19:15 IST2016-12-27T19:09:31+5:302016-12-27T19:15:13+5:30

सरत्या वर्षाला बाय करण्यासाठी ‘बी टाऊन’चे सेलिब्रिटीही आता उत्सुक झाले आहेत. कुणी परदेशात आऊटिंग, पार्टी प्लॅनिंग, लाँग ड्राईव्हला जाण्यासाठीचे ...

First Year of New Year Shared by Anshka | अनुष्काने शेअर केला न्यू इअरचा फर्स्ट व्हिडीओ

अनुष्काने शेअर केला न्यू इअरचा फर्स्ट व्हिडीओ

त्या वर्षाला बाय करण्यासाठी ‘बी टाऊन’चे सेलिब्रिटीही आता उत्सुक झाले आहेत. कुणी परदेशात आऊटिंग, पार्टी प्लॅनिंग, लाँग ड्राईव्हला जाण्यासाठीचे बेत आखण्यात व्यस्त आहेत. अनुष्का शर्माही आता तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटर विराट कोहली याच्या फॅमिलीसह टिहरी येथे नववर्षाचे स्वागत करणार आहे. नुकतेच ते दोघे माध्यमांना डेहराडून येथील एअरपोर्टवर दिसले. अनुष्काने चाहत्यांसाठी न्यू इअरचे सरप्राईज गिफ्ट म्हणून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती मोराला दाणे खाऊ घालताना दिसत आहे. 

२०१६ हे वर्ष अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासाठी यशस्वी ठरले आहे. ‘सुल्तान’ आणि ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चाहत्यांसोबत समीक्षकांनीही कौतुकाची थाप दिली. सध्या ती शाहरूख खानसोबत ‘रहनुमा’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली याच्या आगामी चित्रपटासाठी शाहरूखसोबत काम करताना मजा येतेय. सेटवर शाहरूखसोबत फिलॉसॉफिकल पातळीवर जाऊन आम्ही एकमेकांचे आयुष्य शेअर करतो, असे ती सांगते. 

                                               

Web Title: First Year of New Year Shared by Anshka