हनीमूनच्या रात्री त्याने मला मित्रासोबत...; करिश्मा कपूरची धक्कादायक आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:31 PM2021-11-19T13:31:14+5:302021-11-19T13:31:39+5:30

करिश्मा कपूरने हनीमूनला तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.

On the first night of the wedding, Karisma Kapoor's husband stabbed her; Her deal with friends | हनीमूनच्या रात्री त्याने मला मित्रासोबत...; करिश्मा कपूरची धक्कादायक आपबिती

हनीमूनच्या रात्री त्याने मला मित्रासोबत...; करिश्मा कपूरची धक्कादायक आपबिती

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री करीश्मा कपूर बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी एकेकाळी तिने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र लग्नानंतर तिने बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले होते. करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. मात्र आता ती विभक्त झाली आहे. तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन ती एकटीच करते आहे. एका मुलाखतीदरम्यान करीश्माने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.

करीश्मा कपूरने एका मुलाखतीत लग्नानंतर तिला आलेल्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. तिने सांगितले होते की, तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले होते. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या सासरची मंडळीदेखील तिचा छळ करत होते.
करीश्मा म्हणाली की, जेव्हा ती आणि संजय हनिमूनला गेले होते तेव्हा तिथे संजयने त्याच्या काही मित्रांसोबत करिश्माचा सौदा केला होता. करिश्माने सांगितले की संजयने तिला संपूर्ण एक रात्र त्याच्या मित्रांसोबत व्यतित करायला सांगितली होती. जेव्हा ती या गोष्टीसाठी तयार झाली नाही तेव्हा त्याने तिला खूप मारहाण केली.

लग्नानंतर ५-६ वर्षातच त्यांच्या नात्यात आली कटुता
याशिवाय करीश्माने हे देखील सांगितले की सासरी तिच्या सासूसोबत तिचे अजिबात पटत नव्हते. तिची सासू तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून हात उचलायची.‌ एवढेच नाही तर संजय त्याच्या भावाला करिश्माच्या पाळतीवर ठेवले होते. तसेच संजय लहान-सहान गोष्टींवरून चिढायचा आणि तिला मारायचा. करिश्माने  २००३ ला बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर पाच-सहा वर्षातच त्यांच्या नात्यात कटुता आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

२०१६ साली करिश्मा झाली वेगळी
त्यानंतर करीश्मा तिची आई बबितासोबत राहू लागली. अखेर २०१६ या दोघांनी घटस्फोट घेतला. रिपोर्टनुसार या दोघांनी आपापसातील सामंजस्याने घटस्फोट घेतला होता. संजय कपूरने पोटगी म्हणून करिश्माला १० कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या तोच त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्चसुद्धा करतो आहे.

वर्कफ्रंट
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा बऱ्याच चित्रपटात तिने काम केले आहे. बॉलिवूडपासून खूप काळ लांब राहिल्यानंतर करीश्माने काही महिन्यांपूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्ममधून कमबॅक केले आहे. ती मेंटलहूड या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसली होती. तसेच एका रिएलिटी शोमध्येदेखील झळकली होती.

Web Title: On the first night of the wedding, Karisma Kapoor's husband stabbed her; Her deal with friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.