नील नितिन मुकेशच्या 'फिरकी'चा फर्स्ट लुक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:33 IST2017-07-26T08:58:20+5:302017-07-26T14:33:52+5:30

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफी, के.के मेनन आणि करण सिंग ग्रोवर पहिल्यांदा एकच चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.'फिरकी' ...

First look out for Neil Nitin Mukesh's 'spin' | नील नितिन मुकेशच्या 'फिरकी'चा फर्स्ट लुक आऊट

नील नितिन मुकेशच्या 'फिरकी'चा फर्स्ट लुक आऊट

लिवूड अभिनेता नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफी, के.के मेनन आणि करण सिंग ग्रोवर पहिल्यांदा एकच चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.'फिरकी' या चित्रपटात ते एकत्र दिसणार आहेत. याचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. नीलने हे पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. यात तो जॅकी श्रॉफ, के. के. मेमन, करण सिंग ग्रोव्हर आणि संदीपा धरसोबत दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भट्ट आणि शिबानी दांडेकर करणार आहे.   


संदीपा धर या आधी लाईफ में, दबंग 2, हीरोपंती आणि बारात कंपनी या सारख्या चित्रपटात दिसली आहे. सध्या नील नितीन मुकेश त्याचा आगामी चित्रपट इंदू सरकारच्या रिलीजला घेऊन चर्चेत आहे. मधुर भंडारकरच्या या चित्रपट तो दिगवंत नेते संजय गांधी यांची भूमिका साकारतो आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनमध्ये सुद्धा दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच नील रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या सेटवर गेला होता. तेव्हा परिणीति चोप्राने त्याचे म्युझिकल वेलकम केले होते. परिणीतिने नीलसोबत एक व्हिडिओ बनवून तो पोस्ट केला होता ज्यात दोघे चित्रपटाच्या ट्रकवर डान्स करत होते. यानंतर काही वेळाने नीलने रोहित शेट्टीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. गोलमान अगेनमध्ये नील, परिणीतिसह तब्बू. अजय देवगण, तुषार कपूर आणि अर्शद वारसीपण दिसणार आहेत. हा गोलमाल सीरिजचा चौथा चित्रपट आहे. याआधी नीलने कधीच कॉमेडी चित्रपट काम केले नाही आहे. नील शेवटचा सलमान खान सोबत प्रेम रत्न धन पायो चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसला होता.  

Web Title: First look out for Neil Nitin Mukesh's 'spin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.