​ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 18:56 IST2016-06-16T13:26:48+5:302016-06-16T18:56:48+5:30

‘मस्ती’ व ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणारे रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी पून्हा एकदा ...

First Look at Great Grand Fun | ​ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक लॉन्च

​ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक लॉन्च

स्ती’ व ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणारे रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी पून्हा एकदा पे्रक्षकांना लोटपोट करण्यासाठी येत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘ग्रेट गॅँड मस्ती’चा फर्स्ट लूक नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक रितेश देशमुखनं ट्विटरवर शेअर केला आहे.

२००४ मध्ये ‘मस्ती’ हा एॅडल्ट चित्रपट रिलीज झाला होता. बॉलीवूडमधला मस्ती हा पहिला एॅडल्ट कॉमेडी चित्रपट होता. रितेश, विवेक आणि आफताब या तिघांना विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करणाची इच्छा आणि त्यातून होणाºया गोंधळावर हा चित्रपट होता. 
मस्तीच्या यशानंतर नऊ वर्षांनी ग्रँड मस्ती हा चित्रपट आला आणि आता ग्रेट ग्रँड मस्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २२ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

Web Title: First Look at Great Grand Fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.