अखेर नागा चैतन्यसोबतच्या नात्यावर शोभिता धुलिपालानं सोडलं मौन, लग्नाबद्दल खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:07 IST2023-06-23T13:05:44+5:302023-06-23T13:07:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ती साऊथचा स्टार नागा चैतन्य(Naga Chaitanya)ला डेट करत असल्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Finally, Shobhita Dhulipala broke her silence on her relationship with Naga Chaitanya, revealed about her marriage | अखेर नागा चैतन्यसोबतच्या नात्यावर शोभिता धुलिपालानं सोडलं मौन, लग्नाबद्दल खुलासा करत म्हणाली...

अखेर नागा चैतन्यसोबतच्या नात्यावर शोभिता धुलिपालानं सोडलं मौन, लग्नाबद्दल खुलासा करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ती साऊथचा स्टार नागा चैतन्य(Naga Chaitanya)ला डेट करत असल्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. समांथापासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर सातत्याने ते दोघे चर्चेत येऊ लागले. नुकत्याच एका मुलाखतीत शोभिताने सांगितले की लाइमलाईटमध्ये यायला तिला काहीच त्रास नाही. पण लोकांनी तिच्या खासगी आयुष्यापेक्षा तिच्या कामाबद्दल जास्त चर्चा करायला पाहिजे.  

नुकतेच एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल शोभिता म्हणाली की, अशा वृत्तांमुळे तिला काहीच फरक पडत नाही. पण जर प्रेक्षक तिच्या खासगी लाइफपेक्षा प्रोफेशनल लाइफबद्दल बोलतील तर तिला आनंद होईल. ती पुढे म्हणाली की, ती विजागची आहे, त्यामुळे तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक पावलांवर खूप मेहनत घ्यावी लागते. 

माझ्या खासगी आयुष्याबद्दल कसे बोलू शकतात?
ती पुढे म्हणाली की, जर तुम्ही मला पाहताय किंवा ओळखतात तर माझ्या गुणांना, कठोर परिश्रम आणि कलेसाठी ओळखा. जे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. मी म्हणते की ते माझ्या खासगी आयुष्याबद्दल कसे बोलू शकतात? मी त्यांना सांगू इच्छिते की मी माझ्या क्राफ्टवर खूप मेहनत घेतली आहे तर कमीत कमी याकडे पाहा. मी सहजरित्या त्रस्त होत नाही.

लग्नाबद्दल केला खुलासा
या मुलाखतीत शोभिताने लग्नाबद्दलही सांगितले. तिने या मुलाखतीत तिला पती कसा हवा आहे आणि त्याच्यात कोणते गुण असले पाहिजे, याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, तुम्ही जीवनात कितीही प्रगती केली तरी नम्र असले पाहिजे. साधेपणा, चांगले मन, इतरांबद्दल दयाळूपणा असला पाहिजे. आयुष्य खूप लहान आहे हे समजून घेऊन जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. ती म्हणाली की तिला असाच व्यक्ती हवाय, जो मातीशी जोडलेला असेल.

वर्कफ्रंट...
जोया अख्तर आणि रिमा कागती यांची सीरिज मेड इन हेवनमध्ये मुख्य भूमिकेतून शोभिता धुलिपाला लोकप्रिय झाली. शेवटची ती पोन्नियन सेल्वनमध्ये झळकली आहे. तसेच ती द नाइट मॅनेजर पार्ट २मध्ये दिसणार आहे. हा ३० जूनला डिस्नी प्लस हॉटस्टार रिलीज होणार आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Finally, Shobhita Dhulipala broke her silence on her relationship with Naga Chaitanya, revealed about her marriage