अखेर प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी दिले मुलाचं लग्न तुटण्यामागचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:28 IST2019-05-06T12:20:23+5:302019-05-06T12:28:03+5:30

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे तुटतलेलं लग्न सध्या सगळीकडे चर्चाचा विषय आहे. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी मुलाचे लग्न तुटल्याचे कंन्फर्म केले.

Finally priyanka mother madhu chopra reveals the reason behind breaking madhu chopra marriage | अखेर प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी दिले मुलाचं लग्न तुटण्यामागचे कारण...

अखेर प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी दिले मुलाचं लग्न तुटण्यामागचे कारण...

ठळक मुद्दे इशिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केले

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे तुटतलेलं लग्न सध्या सगळीकडे चर्चाचा विषय आहे. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी मुलाचे लग्न तुटल्याचे कंन्फर्म केले. मात्र लग्न तुटण्यामागचे कारण त्यांनी याआधी गुलदस्त्यात ठेवले होते. 

स्पॉटबायला दिलेल्या मुलाखतीत मधु चोप्रा म्हणाल्या, ''माझा मुलगा सिद्धार्थचे लग्न आता होत नाही आहे. त्याला थोडा आणखी वेळ हवा आहे. मला ही वाटतेय लग्नासारख्या विषयांमध्ये घाई करणं ठिक नाही.''   

आधी इशिताच्या इमर्जेंसी सर्जरीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली असे कारण सांगण्यात येत होते.  27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली. भावाच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत आली देखील होती. मात्र लग्न पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रियंका न्यूयॉर्कला परतली. त्यानंतर इशिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. यात रोका सेरिमनीचे फोटोदेखील होते.इशिताला प्रियंका आणि त्याची आई मधु चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले आणि तिथेच शंकेची पाल चुकचुकली होती. 

 इशिताने इन्स्टावर एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. इशिताने लिहिले आहे की, चीअर्स एका नव्या सुरुवातीसाठी अशा संदर्भातले कॅप्शन तिने दिले आहे. दुसरीकडे प्रियंका आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन इशिताला अनफॉलो केले आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि इशिताचे नातं संपुष्टात आल्याची चर्चा सुरु झाली होती. 

Web Title: Finally priyanka mother madhu chopra reveals the reason behind breaking madhu chopra marriage