तळागाळातील माणसाची कथा तुफानमध्ये, निर्माते म्हणाले - चित्रपटातील कथा वाटेल जवळची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:04 PM2021-04-20T17:04:21+5:302021-04-20T17:15:44+5:30

या चित्रपटात फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

filmmaker rakesh omprakash mehra said "movie toofan story is very close to every man" | तळागाळातील माणसाची कथा तुफानमध्ये, निर्माते म्हणाले - चित्रपटातील कथा वाटेल जवळची

तळागाळातील माणसाची कथा तुफानमध्ये, निर्माते म्हणाले - चित्रपटातील कथा वाटेल जवळची

googlenewsNext

राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी चित्रपट 'तुफान' बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका 'तुफान'मध्ये दिसणार आहे. 

चित्रपटाबद्दल बोलताना, निर्देशक राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणतात की, ''तुफान ही एक तळागाळातील माणसाची कथा आहे आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे कि ती मतभेद निर्माण करण्याऐवजी प्रेम निर्माण करणारी कथा आहे. प्रत्येक देश, मग तो श्रीमंत असो की गरीब, कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासला आहे. आपल्या सर्वांची मनं जखमी आहेत. तूफान त्या जखमांवर सुखदायक मलम लावणारी कथा आहे. जगातल्या कुठल्याही भागातली कोणतीही व्यक्ती, स्वतःला चित्रपटाच्या कथेशी जोडून घेऊ शकेल." 

पुढे ते म्हणाले की, ''तुफानमध्ये महिला नायिकेची देखील खूप मजबूत  भूमिकेत आहे. आपण मागील दशकात नारी शक्तिचा उदय बघितला आहे, मात्र अजूनही एक मोठे अंतर कापणे बाकी आहे. आपल्याला आपल्या विश्वासावर प्रश्नचिन्ह लावणे बंद करावे लागेल की आपण स्त्रियांकडे कसे पाहतो आणि मृणालची व्यक्तिरेखा अनन्या अशीच आहे. विशेष करून महिला याच्याशी स्वतःला जोडून घेऊ शकतील." ‘तूफ़ान’, रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे निर्मित असून या प्रेरणादायक स्पोर्ट्स ड्रामाचा प्रीमियर अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 21 मे 2021ला होणार आहे.

या चित्रपटात फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या भूमिकेसाठी सहा आठवड्यात तब्बल 15 किलो वजन वाढविले होते.
 

Web Title: filmmaker rakesh omprakash mehra said "movie toofan story is very close to every man"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.