इश्कजादेनंतर परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर दिसणार या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 12:22 IST2017-07-03T06:52:36+5:302017-07-03T12:22:36+5:30
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांची जोडी इश्कजादे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या ...
.jpg)
इश्कजादेनंतर परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर दिसणार या चित्रपटात
अ ्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांची जोडी इश्कजादे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघे लवकरच दिबाकर बॅनर्जीच्या चित्रपट दिसणार आहेत. ज्या चित्रपटाचे नाव नुकतेच फायनल करण्यात आले होते. यश राज बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात येतो आहे.
![]()
ड्रामा थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटाचे नाव 'संदीप और पिंकी फरार' असे ठेवण्यात आले आहे. ही गोष्ट एक अशा कपलची आहे जे एकमेंकाबरोबर पण नाही राहु शकत आणि एकमेंकाशिवाय पण राहु नाही शकत. दोघांचे स्वभाव खूपच वेगळे आहेत. दोघांच्या मनात एकमेंकाशी विषयी चीड असते. अर्जुन कपूर यात हरियाणवी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. परिणीतीची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.अर्जुन आणि परिणीती दिबाकर बॅनर्जीसोबत पहिल्यांदाच काम करतायेत त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास ते उत्सुक आहेत. इश्कजादेमध्ये परिणीती सोबत काम केलेल्या अर्जुन कपूर म्हणतो यशराज आणि परिणीतीसोबत माझा काम करण्यात अनुभव खूपच छान आहे. परिणीती म्हणते इश्कबाजेनंतर दिबाकर बनर्जींसोबत काम करण्याचे माझे आणि अर्जुनचे स्वप्न होते जे आता पूर्ण होते आहे. याचित्रपटातले माझी भूमिका करायला मी पूर्णपणे तयार असल्याचा ती म्हणाली. बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करण्यासाठी परिणीतीला एका हिटची गरज असल्याचे बोलले जाते आहे.
इश्कजादेमध्ये परिणीती आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. दोघांच्या कामाचे ही समीक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे म्हटलं जातेय.