संजय लीला भन्साळींच्या आईला कधी पाहिलंय का? 'या' कारणामुळे दिग्दर्शक लावतो वडिलांच्या जागी आईचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:18 PM2023-06-01T16:18:50+5:302023-06-01T16:20:21+5:30

Sanjay leela bhansal: त्या दिवसापासून संजय लीला भन्साळी यांनी वडिलांचं नाव लावणं सोडून दिलं.

film maker sanjay leela bhansali mother leela bhansali first photo viral on social media | संजय लीला भन्साळींच्या आईला कधी पाहिलंय का? 'या' कारणामुळे दिग्दर्शक लावतो वडिलांच्या जागी आईचं नाव

संजय लीला भन्साळींच्या आईला कधी पाहिलंय का? 'या' कारणामुळे दिग्दर्शक लावतो वडिलांच्या जागी आईचं नाव

googlenewsNext

'हम दिल दे चुके सनम','रामलीला','बाजीराव-मस्तानी' असे एकाहून एक सरस चित्रपट बॉलिवूडला देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) . आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीत  त्यांचं नाव प्रथम क्रमांकावर घेतलं जातं. ज्या प्रमाणे संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येतात. त्याचप्रमाणे अनेकदा त्यांच्या पर्सनल लाइफचीही चर्चा होते. यात खासकरुन त्यांच्या नावाची. भन्साळी त्यांच्या नावापुढे कायम आपल्या आईचं नाव लावतात. परंतु, त्यांची आई कशी दिसते, त्या काय करतात हे कोणालाही माहित नाही. त्यामुळेच त्यांची आई कशी दिसते ते पाहुयात.

संजय भन्साळी त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावतात. त्यामुळे ते आईचं नाव का लावतात, त्यांची आई कोण असे प्रेश्न नेटकऱ्यांना पडतात. यात अलिकडेच त्यांच्या आईचा फोटो समोर आला आहे. अभिनेता शेखर सुमनचा लेक अध्ययन सुमन याने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात. संजय लीला भन्साळी यांच्या आईचा फोटो पाहायला मिळतो.

गणेशोत्सवाच्या काळात अध्ययने संजय लीला भन्साळी यांच्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला गेला होता. त्यावेळी लीला भन्साळीदेखील तेथे होत्या. यावेळी अध्यययने त्यांच्यासोबत फोटो काढत तो चाहत्यांसोबत शेअर केला. संजय भन्साळी यांची आई अत्यंत साधी असून तितक्याच त्या प्रेमळ असल्याचं पाहायला मिळतं.

संजय लीला भन्साळी आईचं नाव का लावतात माहितीये?

संजय लीला भन्साळी यांचे वडील प्रसिद्ध निर्माता होते. मात्र, करिअरमध्ये अनेक चढउतार सहन केल्यामुळे ते दारुच्या आहारी गेले होते. दारुच्या नशेत असल्यामुळे त्यांचं घराकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्यामुळे वडिलांची ही अवस्था पाहता संजय भन्साळी यांच्या आईने लीला भन्साळी यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.  त्या गुजराती नाटकांमध्ये वगैरे काम करुन घरखर्च चालवत होत्या. इतकंच नाही तर त्यांनी अनेकदा लोकांचे कपडेदेखील शिवून दिले. त्यामुळेच आपल्या आईने आयुष्यभर केलेला संघर्ष, कष्ट याची जाणीव ठेऊन संजय भन्साळी यांनी त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावण्यास सुरुवात केली.

काय आहे त्यांच्या वडिलांचं नाव 

संजय लीला भन्साळी यांच्या वडिलांचं नाव डी. ओ. भन्साळी असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, ते कायम आईचं नाव लावत असल्यामुळे त्यांच्या वडिलांचं नाव फार मोजक्या जणांना माहित आहे. संजय लीला भन्साळी उत्तम दिग्दर्शक असण्यासोबत लेखक, निर्मातादेखील आहेत.

Web Title: film maker sanjay leela bhansali mother leela bhansali first photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.