या चित्रपटात जॉन अब्राहमला करायचेय अक्षय कुमारसोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 15:16 IST2018-05-22T09:46:22+5:302018-05-22T15:16:22+5:30
अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. जॉन आणि अक्षय पुन्हा एकदा ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहे. ...

या चित्रपटात जॉन अब्राहमला करायचेय अक्षय कुमारसोबत काम
अ ्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. जॉन आणि अक्षय पुन्हा एकदा ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहे. जॉन हा अक्षय कुमारचा खूप चांगला मित्र आहे. दोघांनी गरम मसाला, देसी बॉइज आणि हाऊसफुल्ल सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघे आता 'गरम मसाला 2'मध्ये एकत्र दिसणार आहे.
फिल्मफेयरशी बोलताना जॉन अब्राहम म्हणाला की, गरम मसाला चित्रपट काम केल्यानंतर मला कॉमेडी जॉनरचे चित्रपट करायला मला आवडू लागले. त्याला अक्षयसोबत 'गरम मसाला 2'मध्ये काम करायचे आहे. पुढे जॉन म्हणाला, यासंदर्भात मी अक्षयशी बोललो सुद्धा आहे. याबाबत आम्ही काही तरी प्लॉनिंग करतो आहे. मी आता या चित्रपटाबाबत जेव्हा विचार करतो तेव्हा मला हसू येते. कॉमेडी आता माझे फेव्हरेट जॉनर बनले आहे.
लवकरच जॉन 'परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण'मध्ये दिसणार आहे. १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाºया या चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेन्टी आणि बोमन इराणी अशी स्टारकास्ट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, सैविन कदरोस आणि संयुक्ता चावला शेख यांनी. या दोघांनी याआधी ‘नीरजा’ची पटकथा लिहिली होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ‘जो भी यह काम करेगा उसे ना कोई आॅफिशियल पोस्ट मिलेगी, ना सैलरी, ना मेडल, ना फेम’ या डायलॉगने होते ट्रेलरची सुरुवात होते. यावेळी जॉनचा अंदाज बघण्यासारखा असतो. देशाच्या अनुशक्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल याविषयी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. २३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.