फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:25 IST2025-11-20T13:24:29+5:302025-11-20T13:25:19+5:30
फातिमा सना शेख आगामी 'गुस्ताख इश्क' सिनेमात दिसणार आहे.

फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
'दंगल'फेम अभिनेत्री फातिमा सना शेख आगामी 'गुस्ताख इश्क' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात विजय वर्मासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त फातिमाने फेमिनिझम मुद्द्यावरही भाष्य केलं. स्त्री-पुरुष समानता म्हणजे नक्की काय आहे यावर तिने आपले विचार मांडले. काही महिन्यांपूर्वी तिचा 'धक धक'सिनेमा आला होता. यात फक्त अभिनेत्रीच होत्या. सिनेमाचा अनुभव सांगताना तिने फेमिनिझमवर भाष्य केलं.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत फातिमा सना शेख म्हणाली, "फेमिनिस्ट असणं म्हणजे पुरुषांना कमी दाखवणं नव्हे तर स्त्री पुरुष समानतेचं समर्थन करणं आहे. आपल्याला अनेकदा असं वाटतं की फक्त महिलाच असे सीन्स लिहू शकते जे धक धक मध्ये दाखवण्यात आलं हतं. पण ते सीन्स तर तरुण दुदेजा पुरुष दिग्दर्शकाने लिहिले होते. तो खूप फेमिनिस्ट आहे. फेमिनिस्ट असणं म्हणजे तुम्ही मेल बॅशिंग वुमन असणं असा होत नाही."
ती पुढे म्हणाली, "कित्येक पुरुष फेमिनिजमपासून लगेच दूर पळतात. ते याच्या बेसिक प्रिंसिपल्सशी सहमत नाही असं नाही तर त्यांना मुळात ही गोष्टच समजत नाही. उदाहरणार्थ आजकाल आपण रील्स पाहतो ज्यात एखादा मुलगा मुलांना विचारतो की तू फेमिनिस्ट आहेस? तर दुसरा म्हणतो 'नाही, मी फेमिनिस्ट नाही'. अरे मग तुम्ही काय आहात? बास, नाही आम्ही फेमिनिस्ट नाही. तर गोष्ट फक्त इतकीच आहे की लोकांना या शब्दाचा अर्थच माहित नाही. ही जजमेंटची गोष्ट नाही की महिलाच महिलांना जज करतात. हा स्टेरिओटाईप्स आहे की महिलाच महिलांच्या वैकी असतात'.