घरात चार मुली जन्मल्या म्हणून दु:खी होते वडील; आज त्याच करतात बॉलिवूडवर राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 13:39 IST2020-05-13T13:38:19+5:302020-05-13T13:39:20+5:30

स्टोरी ऑफ मोहन सिस्टर्स...

Father Was Unhappy & Angry With The Birth Of Mohan sisters, Now They Are Ruling Bollywood-ram | घरात चार मुली जन्मल्या म्हणून दु:खी होते वडील; आज त्याच करतात बॉलिवूडवर राज्य

घरात चार मुली जन्मल्या म्हणून दु:खी होते वडील; आज त्याच करतात बॉलिवूडवर राज्य

ठळक मुद्देमुक्ती मोहन हिचे सुद्धा डान्सिंगच्या दुनियेत मोठे नाव आहे. तिनेही अनेक चित्रपटांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले.

घरी मुलगी जन्मास येणे आजही अनेकजण शाप मानतात.आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास येण्याआधीच गर्भातच तिची हत्या केली जाते. अर्थात हळूहळू परिस्थिती बदलतेय. आज आम्ही अशाच चार बहिणींबद्दल सांगणार आहोत. त्या जन्माला आल्या तेव्हा त्यांचा बाबा दु:खी झाला होता. मनातून संतापला होता. पण आज त्याच बाबाच्या या चार लेकी बॉलिवूडवर राज्य करतात. आम्ही बोलतोय ते मोहन सिस्टर्सबद्दल. होय, नीती मोहन, शक्ती मोहन, मुक्ती मोहन आणि किर्ती मोहन या चौघी बहिणींबद्दल.

कधीकाळी घरात चार मुलीच जन्माला आल्या म्हणून त्यांचे वडील ब्रिज मोहन शर्मा दु:खी होते. पण आज त्याच चार मुलींनी ब्रिज मोहन यांच्यासह घराण्याचे नाव काढले आहे. मुली मुलापेक्षा कमी नसतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

या चौघींनी आपल्यातील टॅलेंटच्या बळावर  स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. कुणी सिंगीग तर कुणी डान्सिंगच्या दुनियेत धम्माल केली. 
नीती मोहन ही मोहन सिस्टर्समधील सगळ्यात मोठी आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातील ‘इश्कवाला लव्ह’ या गाण्याने ती लोकप्रिय झाली आणि पुढे तिच्या आवाजाने अनेकांना मोहिनी घातली. तिने अनेक बॉलिवूडची गाणी गायली. बॉलिवूडच्या आघाडीच्या गायिकांमध्ये आज तिची गणना होते.

शक्ती मोहन ही बॉलिवूडची आघाडीची कोरिओग्राफर. डान्स इंडिया डान्स हा रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज हीच शक्ती अनेक रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणून मिरवते.

मुक्ती मोहन हिचे सुद्धा डान्सिंगच्या दुनियेत मोठे नाव आहे. तिनेही अनेक चित्रपटांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले.
मोहन सिस्टर्समध्ये सर्वात धाकटी किर्ती मोहन बॉलिवूडमध्ये नाही. पण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात नाव कमावते आहे. तिघी बहिणी बॉलिवूडवर राज्य करत असल्याने किर्तीही चर्चेत असते.

Web Title: Father Was Unhappy & Angry With The Birth Of Mohan sisters, Now They Are Ruling Bollywood-ram