Throwback : आईचं बोट धरून चालणारी ही चिमुकली आज आहे टॉपची सेलिब्रिटी, ओळखा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:00 AM2022-02-28T08:00:00+5:302022-02-28T08:00:02+5:30

Throwback : बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहताना चाहते हरकून जातात. सध्या सोशल मीडियावर असे असंख्य फोटो व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक फोटो व्हायरल होतोय.

farhan akhtar wife shibani dandekar childhood photo viral on social media | Throwback : आईचं बोट धरून चालणारी ही चिमुकली आज आहे टॉपची सेलिब्रिटी, ओळखा कोण?

Throwback : आईचं बोट धरून चालणारी ही चिमुकली आज आहे टॉपची सेलिब्रिटी, ओळखा कोण?

googlenewsNext

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो पाहताना चाहते हरकून जातात. सध्या सोशल मीडियावर असे असंख्य फोटो व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक फोटो व्हायरल होतोय. होय, आई आणि लेकीचा हा फोटो बीचवरचा. आई लेकीचा हात पकडून तिच्यासोबत समुद्राकाठी चालताना दिसतेय. आई कॅमे-याकडे पाहून हसतेय, तर फोटोतील चिमुकली शांतपणे आईचं बोट पकडून चालतेय. ही चिमुकली कोण? तुम्ही ओळखलंत?

काही दिवसांपूर्वीच या चिमुकलीचं थाटामाटात लग्न पार पडलं. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तुम्ही अद्यापही या चिमुकलीला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. ही आहे, मिसेस अख्तर अर्थात फरहान अख्तरची नववधू शिबानी दांडेकर (Shibani Dandekar ).
गेल्या 19 तारखेला फरहान व शिबानी यांचं लग्न झालं. दोघंही गेल्या 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या लग्नाला आठवडा झालाये, पण अद्यापही या लग्नाची चर्चा सुरू आहे.

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. टाइमपास या मराठी चित्रपटातसाजूक तुपातली पोळी या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. आज तिचा वाढदिवस.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 2015 मध्ये  आय कॅन डू दॅट  या टेलिव्हिजन शोच्या सेटवर भेटले होते. फरहान अख्तर हा शो होस्ट करत होता आणि अभिनेत्री या शोमध्ये स्पर्धक होती. या शोदरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.2018 मध्ये शिबानीच्या आयुष्यात फरहानची एन्ट्री झाली.शिबानीसाठी फरहानने पहिली पत्नी अधुनाला घटस्फोट दिला, असं म्हटलं जातं. पण चर्चा खरी मानाल तर अधुनाला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरानं दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.

Web Title: farhan akhtar wife shibani dandekar childhood photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.