फरहान अख्तरने शेअर केला गर्लफ्रेन्डचा फोटो, युजर्सनी विचारले, ‘हिला कुठला आजार आहे का?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:02 IST2019-08-28T12:01:15+5:302019-08-28T12:02:15+5:30

फरहानने एक फोटो शेअर करत शिबानीला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात. पण फरहानने हा फोटो शेअर करताच युजर्सनी त्याला भंडावून सोडले.

farhan akhtar share picture on girlfriend shibani dandekar social media troll | फरहान अख्तरने शेअर केला गर्लफ्रेन्डचा फोटो, युजर्सनी विचारले, ‘हिला कुठला आजार आहे का?’

फरहान अख्तरने शेअर केला गर्लफ्रेन्डचा फोटो, युजर्सनी विचारले, ‘हिला कुठला आजार आहे का?’

ठळक मुद्दे फरहान सध्या प्रियंका चोप्रासोबत ‘द स्काय इज पिंक’ दिसणार आहे. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे.

फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकर या दोघांची स्ट्राँग केमिस्ट्री सोशल मीडियावर अनेकदा दिसली आहे. नुकताच शिबानीचा वाढदिवस झाला. फरहानने एक फोटो शेअर करत शिबानीला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात. पण फरहानने हा फोटो शेअर करताच युजर्सनी त्याला भंडावून सोडले.


होय, शिबानीचा हा फोटो कुठल्यातरी गार्डनमधील आहे. हा फोटो शेअर करत, फरहानने तिला बर्थ डे विश केले. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सनशाईन. तू माझ्या चेहºयावरच्या हास्याचे कारण आहे. खूप सारे प्रेम...,’ असे फरहानने लिहिले. फरहान अख्तरच्या या पोस्टवरून युजर्सनी शिबानीला ट्रोल करणे सुुरू केले.  असे काही मजेदार हॅशटॅग लिहिले गेलेत. ‘शिबानीला कुठला आजार आहे का? तिची मान बघून वाटले,’ असे एका युजरने हा फोटो पाहून लिहिले.
अन्य एका युजरनेही अशीच प्रतिक्रिया दिली. ही तर आत्ताच चाळीशी ओलांडल्यासारखी दिसू लागलीय, असे या युजरने लिहिले. काहींनी शिबानीला ‘71 व्या’ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.


पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. फरहान व अधुनाचा संसार 15 वर्षे चालला. पण अचानक दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लगेच फरहान व शिबानीच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे.


 शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठं नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती. शिबानी दांडेकर अभिनयाबरोबरचं गाणं सुद्धा गाते.
फरहान सध्या प्रियंका चोप्रासोबत ‘द स्काय इज पिंक’ दिसणार आहे. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे.

Web Title: farhan akhtar share picture on girlfriend shibani dandekar social media troll