फरहान अख्तरला लागले बॉक्सिंगचे वेड, हे आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 06:00 IST2020-04-18T06:00:00+5:302020-04-18T06:00:00+5:30

फरहान अख्तर घरातच करतोय बॉक्सिंगचा सराव

Farhan Akhtar got mad about boxing, this is the reason TJL | फरहान अख्तरला लागले बॉक्सिंगचे वेड, हे आहे त्यामागचे कारण

फरहान अख्तरला लागले बॉक्सिंगचे वेड, हे आहे त्यामागचे कारण

फरहान अख्तर केवळ एक अभिनेता नसून आपल्या व्यक्तिरेखेला कलात्मकता आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर जिवंत करणारा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने हे सिद्ध केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा पडद्यावर हुबेहूब साकारणारा फरहान, नेहमीच आपल्या दर्शकांसोबत एक असे नाते निर्माण करतो की दर्शक त्याच्या ऑन-स्क्रीन व्यक्तीरेखेसोबत जोडला जातो. आपला आगामी चित्रपट ‘तुफान’मधील बॉक्सरच्या भूमिकेसाठी व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षण घेतल्यानंतर, फरहानने आता बॉक्सिंगला आपल्या घरीच दैनंदिन फिटनेस मध्ये सामील करून घेतले आहे.

बॉक्सिंग हा सोपा खेळ नाही. यामध्ये आपल्या प्रत्येक असहज हालचालींमध्ये सहजता आणावी लागते. याच्या नियमित सरावासोबतच जसा जसा काळ जाईल तसा तसा आपण मारलेल्या प्रत्येक पंचवर प्रभुत्व मिळवावे लागते फरहानने नेहमीच स्वतःला सर्वोत्तम आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी सर्वथा योग्य सिद्ध केले आहे. त्याने आपल्या सर्वोत्तम प्रदर्शनाने आणि दमदार भूमिकांच्या जोरावर नेहमीच स्वत:ला आव्हान देत उत्तम काम करणे सुरूच ठेवले आहे. फरहान वास्तवात एक सामर्थ्यशाली अभिनेता आहे आणि प्रत्येक वेळी आपल्या अद्भुत प्रदर्शनाने दर्शकांचे मन जिंकत आले आहेत.


फरहान तूफानसोबत बॉक्सिंग रिंगमध्ये उतरायला पूर्णपणे सज्ज झाला आहे. आरओएमपी पिक्चर्ससोबत एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन चा हा चित्रपट तूफान राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित करीत असून 18 सप्टेंबर 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Farhan Akhtar got mad about boxing, this is the reason TJL