फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 01:26 PM2018-10-15T13:26:21+5:302018-10-15T18:29:04+5:30

सध्या फरहानच्या आयुष्यात असलेल्या तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही तरुणी दुसरी कोणी नाही तर एक मराठमोळी अभिनेत्री आहे.

Farhan Akhtar confirms his relationship with Shibani Dandekar? | फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली

फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली

googlenewsNext

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरचे ब्रेकअप होऊन कित्येक महिने झाले आहेत. आता तर फरहान आणि श्रद्धा दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. केवळ इतकेच नाही तर दोघांच्याही आयुष्यात नव्या व्यक्तीची एंट्रीही झालीय. सध्या फरहानच्या आयुष्यात असलेल्या तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही तरुणी दुसरी कोणी नाही तर मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर आहे. गेल्या काही दिवसांपासून फरहान आणि शिबानी दांडेकरच्या अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. कालपर्यंत या केवळ चर्चा होत्या. पण शिबानी आणि फरहान नात्यात असल्याची कबुली फरहाननेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

फरहान अख्तरने इन्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिबानी दांडेकर दिसत असून फरहान आणि शिबानी दोघे हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने हार्टचा सिम्बोल टाकलेला आहे. यावरूनच शिबानी आणि फरहान नात्यात असल्याचे कळत आहे. फरहानने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो शिबानीने महिन्याभरापूर्वी तिच्या इन्टाग्रामवर शेअर केला होता. तेव्हापासूनच यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. 

२०१५ पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात. फरहान जो शो होस्ट करत होता. शिबानीही त्या शोचा भाग होती़ पुढे त्यांची मैत्री झाली आणि आता हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय. आता दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही. फरहान हा घटस्फोटित असून दोन मुलांचा बाप आहे. 

फरहान हा अभिनेता असण्यासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आहे. शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. 

Web Title: Farhan Akhtar confirms his relationship with Shibani Dandekar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.