​वाढत्या वजनावरून फरदीन संतापला !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 17:16 IST2016-05-27T11:42:56+5:302016-05-27T17:16:48+5:30

फरदीन खान याची एकेकाळी एक वेगळी ओळख होती. ही ओळख म्हणजे चॉकलेटी हिरोची. चॉकलेटी हिरो म्हणून त्याला बॉलिवूडमध्ये ओळखले ...

Fardeen furious with rising weight !! | ​वाढत्या वजनावरून फरदीन संतापला !!

​वाढत्या वजनावरून फरदीन संतापला !!

फरदीन खान याची एकेकाळी एक वेगळी ओळख होती. ही ओळख म्हणजे चॉकलेटी हिरोची. चॉकलेटी हिरो म्हणून त्याला बॉलिवूडमध्ये ओळखले जायचे. पण आताश: फरदीन चांगलाच गोलमटोल झाला आहे. फरदीनचे हे लूक त्याच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे धक्कादायक आहे. मुंबई एअरपोर्टवरचे अलीकडचा फरदीनचे फोटो पाहिल्यानंतर हाच, काय तो आपला फरदीन?? असा अनेकांना प्रश्न पडला. यानंतर त्याच्या या बदललेल्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा  रंगली. काही नेटीजन्स फरदीनची टर उडवताना दिसले. काहींनी त्याची तुलना बप्पी लाहिडीशी केली.यामुळे साहजिकच फरदीन चांगलाच संतापला. भले-बुरे म्हणणाºया नेटीजन्सला त्याने खरमरीत उत्तर दिले. वाढलेल्या वजनाची मला अजिबात लाज वाटत नाहीयं. माझ्या आयुष्याबद्दल मी आनंदी आहे. वजन वाढले असले तरी आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण मी जगत आहे. माझी टर उडवणाºया सर्व लोकांचे या वीकेंडला माझ्या वाढलेल्या वजनामुळे काहीसे मनोरंजन झाले. माझी टर उडवून तुमचे मन भरले असेल तर आता स्वत:च्या लूककडेही जरा लक्ष द्या, असे फरदीनने लिहिले आहे. सरतेशेवटी आपल्या चाहत्यांचे आभारही मानायला तो विसरला नाही. २०१० मध्ये फरदीनचा शेवटचा चित्रपट ‘दुल्हा मिल गया’ आला होता. 


 

Fardeen Feroz Khan ‎@khanff

DEAR ALL,

NOT ASHAMED NEITHER SHAMED. NOT OFFENDED. NOT DEPRESSED. NOT BLIND EITHER. AM I HAPPY??...http:// 

Web Title: Fardeen furious with rising weight !!