कुक दिलीपची लोकप्रियता पाहून फराह खान झाली हैराण, म्हणाली-"तू कुक्सचा शाहरूख खान झालास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:07 IST2025-10-07T11:06:03+5:302025-10-07T11:07:16+5:30
Farah Khan And Cook Dilip : फराह खानचे कुकिंग व्लॉग्स लोकप्रिय झाल्यावर, दिलीप सगळीकडे लोकप्रिय झाला. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळे दिलीपचे फॅन आहेत.

कुक दिलीपची लोकप्रियता पाहून फराह खान झाली हैराण, म्हणाली-"तू कुक्सचा शाहरूख खान झालास..."
फराह खान (Farah Khan) तर सेलिब्रेटी आहेच, पण तिच्यापेक्षा जास्त तिच्या कुक दिलीप(Cook Dilip)ने धुमाकूळ घातला आहे. फराह खानचे कुकिंग व्लॉग्स लोकप्रिय झाल्यावर, दिलीप सगळीकडे लोकप्रिय झाला. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळे दिलीपचे फॅन आहेत. दिलीप जिथे जातो, तिथे लोक त्याला सहज ओळखतात. आता तर दिलीप 'कुक लोकांचा शाहरुख खान' बनला आहे.
फराह खान तिच्या लेटेस्ट व्लॉगसाठी नुकतीच दिल्लीला पोहोचली होती, जिथे ती कंटेंट क्रिएटर्स लखन आणि नीतू बिष्ट यांना भेटली. संपूर्ण व्लॉगमध्ये फराह तिच्या खास शैलीत दिलीपसोबत मस्ती करताना दिसली. सर्वात मजेदार किस्सा तर तेव्हा घडला, जेव्हा फराहने दिलीपला 'कुक लोकांचा शाहरुख खान' असं म्हटलं. व्लॉगची सुरुवात फराहने नीतू आणि लखनच्या बंगल्याच्या 'टूर'ने केली. घराच्या एका कोपऱ्यात सिल्व्हर आणि गोल्ड प्ले बटन पाहून फराह थक्क झाली आणि मग गंमत करत म्हणाली, ''याला म्हणतात, जळत्यावर मीठ चोळणं.'' यानंतर आली किचनची वेळ, जे खूप आलिशान होतं.
फराह म्हणाली- ''हा कुक लोकांचा शाहरुख खान''
लखनने फराहला त्याच्या कुक बहादुरशी ओळख करून दिली, तेव्हा फराहनेही लगेचच आपला कुक दिलीपला समोर आणून भेटवले. दिलीपला पाहून बहादुर म्हणाला की ''हो, मी पाहिलं आहे याला''. त्याने लगेचच दिलीपला ओळखलं, तेव्हा फराहलाही आश्चर्य वाटलं. फराहने तिच्या विनोदी अंदाजात दिलीपला म्हटलं, ''पाहिला आहे याला. अरे, कुक लोकांमध्ये तुझी खूप प्रसिद्धी आहे. तू 'कुक लोकांचा शाहरुख खान' बनला आहेस.'' हे ऐकून सगळे हसले.
गेल्या १० वर्षांपासून दिलीप फराहच्या घरी करतोय काम
फराह खानने २०२४ मध्ये तिचा कुकिंग यूट्यूब चॅनेल सुरू केला होता, आणि तेव्हापासून केवळ तिचे व्लॉग्सच नाही तर तिचा कुकही लोकप्रिय झाला आहे. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेला दिलीप फराहच्या घरी १० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून काम करत आहे आणि आता तो खूप प्रसिद्ध झाला आहे.